Post Views: 718
गटविकास अधिकारी यांना दिले विविध मागणीचे निवेदन
दर्यापूर – महेश बुंदे
ग्रामिण भागात गरिबांच्या घरांची स्वप्ने पूर्ण करण्यात महत्वाचा कणा असलेल्या राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती स्थरावरील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांनी आज दि 1 डिसेंबर पासून राज्यभर आपल्या विविध मागण्यांसाठी संप जाहीर केला आहे. या कामबंद आंदोलन संदर्भात दर्यापूर पंचायत समितीचे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी सुधीर अरबट यांना आपल्या विविध मागणीचे निवेदन सादर केले.
या निवेदनात म्हटले आहे की,मागील अनेक महिन्यापासून ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांचे वेतन थकित आहे, दिवाळी पण अंधारात गेली,तरी लवकरात लवकर वेतन देण्यात यावे.तसेच इतर कर्मचारी यांना मिळणारे प्रति महा वेतन ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांना सुध्दा देण्यात यावे,अशी मागणी करण्यात आली आहे. शासनाने यावर्षी २० नोव्हेंबर २०२१ पासून मोठया थाटामाटात आवास ₹ अभियान चालू केलं. त्यामुळे २०२२ पर्यंत सर्वांसाठी घर ही घोषणा केवळ पोकळ ठरणार आहे.
मागील वर्षी महा आवास अभियान याच ग्रामीण गृह निर्माण अभियंता यांनी यशस्वी केलं होतं व ग्रामीण भागात सर्वात जास्त घरकुल योजना पोचवली होती. ₹सर्वांसाठी घरे २०२२ ही घोषणा शासनाने दिली आहे. परंतु याच घरकुल योजनेचा महत्वाचा कणा असलेले ग्रामीण गृहनिर्माण अभियंता मागील ९ महिना पासून मानधन पासून वंचित आहेत. अभियंतायांची दिवाळी सणसुध्दा वेतना विना गेला. प्रत्येक घरकुल ७५० इतक्या तुटपुंज्या मानधनावर हे अभियंते २०१६ पासून कार्यरत आहेत. त्यात वाढ व्हावी यासाठी त्यांनी सातत्याने वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला, परंतु त्यांच्या मानधनात जाचक अटी टाकून फक्त २०० रुपये वाढ करून अभियंता यांची कुचेष्टा केली. या उलट अभियंता सोडून बाकी सर्व कर्मचाऱ्यांना भरघोस वेतन वाढ देण्यात आली आहे.
यावेळी निवेदन देताना दत्ता सवळे,अविष्कार वासनिक,अक्षय पेलागडे,दिनेश शिंदे, पूजा तराळ, पल्लवी नेतनराव, शुभम मोखलकर आदी उपस्थित होते.