दर्यापूर – महेश बुंदे
राज्याचे माजी राज्यमंत्री तथा मीरा-भाईंदर मनपाचे माजी विरोधी पक्ष नेता डॉ. आसिफ शेख यांनी दर्यापूर येथील डॉ इकबाल पठाण यांच्या एकता हॉस्पिटला सदिच्छा भेट दिली.
त्याच्यासमवेत मुंबई येथिल उद्योगपती फारुक अली उपस्थित होते. डॉ.इकबाल पठाण यांच्या राहत्या घरी त्यांचे स्वागत समारंभ दर्यापूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी हितगुज व विचारांची देवाण-घेवाण असा एक आगळा-वेगळा स्नेहमिलन सोहळा पार पडला.
