दर्यापूर – महेश बुंदे
आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमानिमित्त मंगळवारी ( ता. ३० ) पोलिस दलाच्या वतीने शहरातील गांधी चौकात देशभक्तीपर पोलिस बँड पथकाची धून दर्यापूरकरांना ऐकावयास मिळाली. यावेळी प्रभारी पोलीस निरीक्षक शिशिर मानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण औटे यांच्यासह इतर पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. पोलिस बँडची धून ऐकण्यासाठी गांधी चौकात दर्यापुरकरांनी गर्दी केली होती.
