दिल्ली येथे भारतीय डाक विभागाच्या वतीने अखिल भारतीय ३४ वी डाक कुस्ती प्रतियोगीता आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत दर्यापूर येथील श्री. हनुमान व्यायाम क्रीडा मंडळ बनोसाचे मल्ल स्वप्नील विलासराव वरूडकर यांनी रौप्य पदक पटकावले आहे. या नेत्रदीपक यशाबद्दल समाजातील सर्वच स्तरातून भारतीय डाक विभागाच्या वतीने दिल्ली परिमंडळच्या वतीने २२ ते २५ नोव्हेंबर राष्ट्रीय कुस्ती प्रतीयोगीता आयोजित करण्यात आली होती.
दर्यापूर येथील स्वप्नील वरूडकर हे भारतीय डाक विभागात कार्यरत असून स्वप्नीलनने ७० किलो वजनी गटात फ्री स्टाईल सहभाग घेतला व विभागात रौप्य पदक मिळविले आहे. या घवघवीत विजया बद्दल स्वप्नील वरूडकर याचे आमदार बळवंत वानखडे, मंडळाचे अध्यक्ष गजानन वाकोडे, गजानन शंके, पावर ऑफ मीडियाचे उपाध्यक्ष गजानन देशमुख, तालुकाध्यक्ष शशांक देशपांडे, हनुमान व्यायाम क्रीडा मंडळाचे मार्गदर्शक गोविंदभाऊ धुराटे, दिलीप चव्हाण, रोहित धुराटे, संतोष मिसाळ, क्रिडाशिक्षक अनिल भारसाकळे आदींनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.