ग्रामसभा ह्या गावाच्या उत्सव बनल्या पाहिजेत

ब्रम्हा येथील ग्रामसचिव अरविंद पडघान यांचा गावविकासासाठी अनोखा ऊपक्रम

प्रतिनिधी फुलचंद भगत:-


वाशिमःग्रामिण भाग हा महत्वाचा घटक असुन गावखेड्याचा विकास साधन्यासाठी विविध विकासकामे लोकांनी सहभाग नोंदवुन सर्व समोपचाराने पुर्ण करण्यासाठी ग्रामसभा महत्वपुर्ण ठरते.हाच मुद्दा हेरुन ब्रम्हा येथील कर्तव्यदक्ष ग्रामसचिव अरविंद पडघान यांनी ग्रामसभा ही सणऊत्सवासारखी घेणे कीती महत्वाचे आहे हे आदर्शवत आणी प्रेरणादायी ऊदाहरण घालुन दिलेले आहे.


अगदी मतदार यादी वाचना पासुन तर शासकीय योजनेचे लाभार्थी निवड असो की, कोणतेही विकास काम/कृतीआराखडा असो, ग्रामसभेची मंजुरी आवश्यक आहे.
म्हणजेच लाखो- करोडो रुपयाचे अनुदान गावात पोहचण्याची पहिली पायरी ग्रामसभा आहे.अशी सर्व मतदार सदस्य असलेली बहुमोल ग्रामसभा सण-उत्सव, यात्रे सारख्या वातावरणात संपन्न झाली पाहिजेत.
हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन ब्रम्हा येथे भारतीय संविधान दिनी सार्वजनिक ठिकाणी मंडप टाकुन ग्रामसभा घेण्यात आली.याकामी ग्रामसेवक यांना सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचे सहकार्य आणि गावकरी मंडळीचा चांगला प्रतिसाद मिळाला.ब्रम्हा येथील ग्रामसभेत लोकहिताच्या ठरावा सोबतच कोविड लसीकरणाचे 100% उद्दीष्ट अल्पावधीत साध्य करण्यास सहाय्य करणारे आरोग्य विभागाचे आणि ग्रामस्तरावर काम करणारे 15 कर्मचारी, केकतउमरा येथील बहुउद्देशीय संस्था प्रतिनिधी यांचा कोविड योध्दा म्हणून प्रशस्तीपत्र देऊन येथोचित सन्मान करण्यात आला.
या मध्ये समुह आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्यसेवक, पार्ट टाईम, अंगनवाडी, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्राम रोजगार सेवक, संगणक परिचालक, मुख्याधापक/शिक्षक, तलाठी, पोलीस पाटील यांचा समावेश आहे.


ग्रामसभेत वैयक्तिक व राजकीय देवेदावे बाजुला ठेऊन सार्वजनिक विकास कामासोबतच, शेवटच्या घटकातील लोकहितासाठी चर्चा झाली आणि तशा पध्दतीने ठराव मंजुर झालेत तर प्रत्येक सुजान नागरीक ग्रामसभेला उपस्थिती दर्शविल्या शिवाय राहणार नाही, एवढे मात्र नक्की.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!