प्रतिनिधी वैभव बावनकुळे:-
अमरावती वार्ता :- दिनांक २४/११/२०२१रोज शुक्रवार ला १५व्या वित्त आयोग अंतर्गत ग्रामपंचायत वाठोडा बु यांच्या वतीने ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रम होता.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच संदीप भि दावेदार प्रमुख पाहुणे पंचायत समिती च्या गटविकास अधिकारी माया वानखडे माजी उपसभापती पंकजभाऊ वानखडे तंटामुक्ती अध्यक्ष दीलिपभाऊ कोरडे माजी तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल भाऊ सावंतउपसरपंच वंदनाताई सावंत,सदस्य विजय शेळके, सदस्या सौ सिमा ज्ञा.सयाम,सौ.रंजनाताई अ.डंबळे,सदस्या चैताली खंडार सचिव श्री.अतुल गडलिंग साहेब तथा प्रशिक्षक सविताताई इंगळे व बुध्दे मडम उपस्थित होते तथा संचलन कु.दिव्या कोरडे हीने केले तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सचिव श्री गडलिंग साहेब यांनी केले तर प्रशिक्षणार्थी ना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले व प्रशिक्षणाचा आलेला अनुभव शितल मो.डंबळे शिवानी भालेराव. संपदा वानखडे यांनी आपले मनोगतातुन व्यक्त केला व कार्यक्रमाची सांगता राष्टवंदनेने करण्यात आली.







