प्रतिनिधी कुणाल शिंदे :-
पुणे :- राजगुरूनगर येथिल जिल्हा व अतिरिक्त सञ न्यायालय या ठिकाणी खेड बार असोसिएशचे निर्वाचीत अध्यक्ष देविदास शिंदे यांच्या प्रयत्नातुन कोविड १९ लसीकरण पार पडले. यावेळी कोर्टाच्या कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी हा लसीकरण घेण्यासाठी गर्दी केलेली पाहायला मिळाली.

खेड बार असोसिएशन कडुन लसीकरणाचा हा आठवा कॅम्प जिल्हा सत्र कोर्टात आयोजित करण्यात आला होता. या कॅम्पचे उद्घाटन जिल्हा न्यायाधिश ए.एम.अंबाळकर साहेब व वकील संघाचे अध्यक्ष अँड.देवीदास युवराज शिंदे पाटील हस्ते उद्घाटन झाले.या कॅम्पमध्ये ९० हुन अधिक वकील,न्यायालयीन कर्मचारी,नागरिक यांचे लसीकरण केले.
