Post Views: 410
२५ नोव्हेंबरला दर्यापूर २६ नोव्हेंबरला धारणी येथे आयोजन
दर्यापूर – महेश बुंदे
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिनानिमित्त युवासेना तर्फे महाराष्ट्रव्यापी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण पर्यटन मंत्री मा. ना. आदित्य साहेब ठाकरे, यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना राष्ट्रीय सचिव मा.वरूनजी सरदेसाई, युवासेना कार्यकारणी सदस्य मा. रूपेशभैया कदम व युवासेना अमरावती लोकसभा विस्तारक मा. राजसाहेब दीक्षित यांच्या सूचनेनुसार तसेच युवासेना अमरावती जिल्हा प्रमुख प्रमोद धानोकर आणि युवासेना अमरावती उपजिल्हा प्रमुख अंकुश कावडकर यांच्या नेतृत्वाखाली युवासेने तर्फे युवासेना मेळघाट प्रभारी विधानसभा संघटक महेंद्रसिंग पवार, युवासेना मेळघाट प्रभारी उपसंघटक पंकज मावस्कर, युवासेना धारणी प्रभारी तालुका प्रमुख शाम पाटोरकर (माजी पंचायत समिती सदस्य धारणी), युवासेना धारणी प्रभारी उपतालुका युनूस शेख, युवासेना धारणी प्रभारी शहर प्रमुख आकाश राठोड यांच्या तर्फे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दि. २५ नोव्हेंबर २०२१ रोजी उपजिल्हा रुग्णालय, दर्यापूर, २६ नोव्हेंबर २०२१ रोजी उपजिल्हा रुग्णालय धारणी, जिल्हा अमरावती येथे सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती युवासेना उपजिल्हा प्रमुख अमरावती अंकुश पाटील कावडकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.