प्रतिनिधी फुलचंद भगत:-
वाशिम:-सरपंचांनी लोकसहभागातून गावाचा शाश्वत विकास साधावा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम यांनी केले. पंचायत राज मंत्रालय भारत सरकार, ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन यांचे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत यशदा पुणे कडून आयोजित नवनियुक्त सरपंच प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी त्यांनी सरपंचांशी संवाद साधला. यावेळी यशदा, पुणे चे अधिकारी डॉ रामप्रसाद पोले, विस्तार अधिकारी विजय खिल्लारे यांची उपस्थिती होते. पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रस्ते आणि वीज ह्या लोकांच्या मुख्य समस्यांवर लक्ष केंद्रित करुन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभागातून कार्य करण्याचे आवाहन निकम यांनी उपस्थित सरपंचांना केले.
