रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण देणे शासकीय व सेवाभावी संस्थांनी संपर्क साधावा

प्रतिनिधी फुलचंद भगत:-


वाशिम:- मनुष्यबळाचे कौशल्य विकसित करून त्यांना मागणी असलेल्या क्षेत्राात रोजगार/ स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्धतेद्वारे परिवार व समाजाचा एक उत्पादक सदस्य म्हणून सन्मानाने आपले भावी आयुष्य समर्थपणे घडविता यावे, यासाठी कौशल्य विकासासंबंधी सर्वसमावेशक अभियान सुरू आहे.


जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम या कार्यालयाच्या वतीने अशाच कौशल्य विकासासंबंधित वेगवेगळ्या योजना व उपक्रम राबविण्यात येतात. जिल्ह्यातील रोजगार/ स्वयंरोजगार इच्छुक युवक-युवतींना कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करून त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग,सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार/ स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना मागणी आवश्यक त्या क्षेत्रात प्रशिक्षित करून देण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक खाजगी, शासकीय-निमशासकीय सेवाभावी संस्थांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम येथे कार्यालयीन वेळेत भेटावे. असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!