पुणे वार्ता :- चाकण , दिनांक 22/11/2021 रोजी सकाळी 06/00 वाजण्याचे सुमारास रिक्षा चालक सुजित अजित काळे, वय-24 ,रा. आंबेठाण पार्क नं. 1 सोसायटी चाकण, अंगार मळा शेजारी आंबेठाण ता खेड व त्याचा मित्र विनोद भगवान हजारे असे हे दोघे चाकण बस स्टँन्ड जवळ रोडवर रिक्षा लावुन उभे असताना बस स्थानक येथील दौंडकर इलेक्ट्रीक दुकानाजवळील एका झाडाजवळ चाकण ता खेड जि पुणे येथे रोडवर गर्दी दिसल्याने सुजित काळे व विनोद हे दोघे त्या ठिकाणी जावुन पाहिले असता दौंडकर इलेट्रीक दुकाना जवळील रोडवर झाडाजवळ एका गोनपाटामध्ये स्त्री जातीचे नवजात अर्भक रडत होते. सदर अर्भक हे नुकतेच एक ते दोन दिवसापुर्वी जन्मलेले असुन तिचे आजुबाजुला कोणीही दिसुन आलेले नाही. अगर तिस(नवजात बालकास )कोणी सोडले याबाबत काहीएक माहिती मिळुन आली नाही. त्यामुळे सुजित व विनोद ह्या दोघांनी सदर मुलीस रिक्षा मध्ये घालुन घेवुन चाकण पोलीस स्टेशन येथे घेवुन गेले.

त्यामुळे फिर्यादि सुजित काळे यांनी पोलिसांना सदरचे नवजात स्त्री अर्भकास कोणीतरी अज्ञात महिलेने तिचे अनैतिक संबंधातुन नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक लोकांपासुन माहिती लपवुन ठेवण्याचे उद्देशाने मोकळ्या जागेत सोडुन दिले आहे. म्हणुन त्यांनी सदर अज्ञात महिले विरुद्ध चाकण पोलीस स्टेशनमध्ये कायदेशीर फिर्याद दिली असुन. सदर नवजात स्त्री जातीचे अभ्रक(बाळ) त्यांनी चाकण पोलीस स्टेशनमध्ये जमा केले असून सदर बाळ चांगल्या व सुस्थितीत आहे.सदर बालकास चेकअप करून आश्रमात ठेवले आहे.

चाकण पोलिस घेणार मातेचा शोध
सापडलेल्या बाळाची माता (महिलेची) . चाकण पोलिस स्टेशन पुढील चौकशी करीत आहे.
