दिनांक २० नोव्हेंबर २०२१ रोजी अंजनगाव रोडवर कोकर्डा – निंभारी फाटा जवळ एक भयानक अपघात झाला. त्यामध्ये माहितीनुसार विजय गेडाम यांचा अपघात झाला. या अपघातामध्ये विजय गेडाम यांना पायाला व डोक्याला मोठ्या प्रमाणात मार होता. अपघाताची तीव्रता एवढी होती की, त्यांच्या पायाची हड्डी तुटून वर आली. स्वतः पेशंट विजय गेडाम यांनी आमदार बळवंत वानखडे यांना फोन केला आणि आमदार बळवंत वानखडे स्वतः आपले सहकारी सोबत घटनास्थळी पोहोचले.
त्यांनी पेशंटला लागलेला मार बघताच तात्काळ एकता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. इकबाल पठाण यांना फोन लावले व त्यांना घटनेची माहिती दिली व सांगितले की, तुम्ही तुमच्या सहकारी सोबत पेशंटच्या उपचाराकरिता तयार राहावे. डॉ. पठाण सूचना मिळताच ते हॉस्पिटल खाली आपल्या सहकारी सोबत पूर्ण तयारीत उपस्थित होते. ॲम्बुलन्स दवाखान्यामध्ये पोचल्यावर डॉक्टर साहेबांनी लागलेला घाव बघितले व त्यांनी निर्णय घेतला की पेशंटला दवाखान्याच्या आतमध्ये न घेता ॲम्बुलन्स मध्येच उपचार करून पेशंटला अमरावती येथे हलविण्याचा सल्ला दिला. या घटनेत जीवित हानी होता होता वाचली, आमदार बळवंत वानखडे, एकता हॉस्पिटलचे संचालक डॉ. इकबाल पठाण, रितेश देशमुख (आमदार खाजगी सहाय्यक), अंकुश डोंगरदिवे, दिलीप गवई, एकता हॉस्पिटलमध्ये उपस्थित झाले आमदार बळवंत वानखडे यांनी केलेली मदत कौतुकास्पद असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.