प्रतिनिधी कुणाल शिंदे, पुणे
पुणे वार्ता :- खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये आज शनिवारी झालेल्या आठवडे बाजारात कोथंबीर व मेथीच्या भाजीची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दरात मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली.

त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजीचा सुर दिसून आला. भाजीपाला बाजारात कोथँबिरीच्या १७,१५० व मेथीच्या ३९,५०० जुड्यांची मोठ्या प्रमाणात आवक झालेली पाहायला मिळाली. भाजीपाला बाजारात कोथिंबीर, व मेथीच्या भाजीची ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडुन जादा आवक झाल्याने ३ ते ५ रुपये मेथीला व ४ ते ६ रुपये कोथिंबीर असा मातीमोल भाव मिळाला.

उत्पादन खर्च, गाडी भाडे ,औषधे मजुरी देखील निघत नसल्याने शेतकऱ्यांना चिंता व्यक्त केली आहे.मात्र काही शेतकऱ्यांनी किरकोळ बाजारात मेथीच्या भाजीची विक्री केल्याने चांगला दर मिळालेला पाहायला मिळाला. .मात्र हिरवी मिरची व टोमॅटोची आवक सर्वात जास्त भाजीपाला बाजारात होऊन देखील दर वाढलेले होते.
आज झालेल्या आठवडे बाजाराची एकुण उलाढाल २८ लाख रुपये इतकी झाल्याचे पाहायला मिळाली.


