Post Views: 365
चांदूर रेल्वे प्रतिनिधी धिरज पवार:-
वंचितचे युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी केले ट्रकचे पुजन, संत्रा परिषदेचे मोठे यश
वंचित बहुजन आघाडीतर्फे चांदूर रेल्वे शहरात संत्रा परिषद होताच तालुक्यातून २० टन संत्र्याची पहिली खेप थेट गुवाहाटीला पाठविण्यात आली असुन वंचितचे युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी या ट्रकचे पुजन केले. संत्रा परिषदेचे सदर मोठे यश मानल्या जात आहे.
चांदूर रेल्वे शहरात वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्यातर्फे आयोजित संत्रा परिषदेत युवा अंगूर निर्यातदार राहुल खाडे (ओझर, नाशिक) हे उपस्थित झाले होते. यावेळी त्यांनी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्याकडे इच्छा जाहीर केली होती की, मी पण संत्रात काम करू शकतो. येथील संत्रा आसाम, गुवाहाटीला नेऊ शकतो. त्यांच्या या सकारात्मक इच्छेनंतर त्यांनी व निलेश विश्वकर्मा यांनी यंत्रणा कामाला लावून केवळ ४८ तासात चांदूर रेल्वे तालुक्यातून २० टन संत्र्याची पहिली खेप तयार केली. वरूड येथे या ट्रकचे पॅकिंग, संत्रा मालाचे व्हॅक्सिनेशन, पॅकिंग या प्रक्रिया झाल्यानंतर रितसर विधीवत पुजन निलेश विश्वकर्मा यांच्या हस्ते रात्री एक वाजता करून ट्रक ला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. हा ट्रक छिंदवाडा, ईलाहाबाद, बनारस, कोलकाता मार्गे गुवाहाटीला रवाना केला.
यावेळी चांदूर रेल्वे तालुक्यातील संत्रा उत्पादक केशव केणे, प्रशांत बोबडे, पंकज वानखडे, श्रीकांत भोयर, नंदकिशोर खेरडे, राजू गफ्फार, सुनील सोनोने या सर्वांच्या सहकार्याने पहिली संत्र्याची खेप रवाना केली. पुढच्या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात संत्रा लागणार आहे, असे मोठे व्यापारी या परिसरात आले तर चांदूर रेल्वे परिसरात सुध्दा वरुड, मोर्शी, चांदूर बाजार सारखी मोठी बाजारपेठ उभी होतील असे वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी म्हटले. यावेळी ट्रक चालक लल्लनसिंग यादव यांचा शाल, श्रीफळ व बक्षीस निलेश विश्वकर्मा यांनी सत्कार केला.