मंगरुळपीर येथे जप्त केलेल्या ट्रकमधील ‘तो’तादुळ केला शासनजमा

प्रतिनिधी फुलचंद भगत:-

मंगरूळपीर येथे अवैध तांदूळाचा ट्रक पकडला,पुरवठा अधिकारी सोळंके यांची धडाकेबाज कारवाई

राशनतस्करी करणारा ट्रक जेरबंद;मंगरुळपीर महसुल विभागाची कारवाई

वाशिम:-मंगरुळपीर येथील कर्तव्यदक्ष पुरवठा अधिकारी रुपाली सोळंके आणी एसडिओ यांनी अवैधपणे तांदुळतस्करी करणार्‍या त्या ट्रकमधील तांदुळसाठा शासनजमा केला आहे.मंगरुळपीर येथे दि.१९ नाव्हेंबरच्या राञी अकराच्या सुमारास मंगरूळपीरचे एसडिओ व पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके यांनी तस्करी करणारा तांदूळाचा ट्रक ताब्यात घेतला आणी पो.स्टे.ला आणला. तपास करून कारवाई करणार असल्याने महसुल व पोलिस विभागाकडुन सांगण्यात आले होते.त्यानुसार सदर ट्रकमधील तांदुळसाठा शासकिय गोदामात जमा करण्यात आला आहे.


राशनतस्करीचे मंगरुळपीर हे विदर्भाचे हब म्हणून ओळखले जाते.याआधी महसुल विभागासह पोलिसविभागानेही अनेक यासंदर्भात कारवाया केल्या आहेत.काहीवर राशनतस्करीसंदर्भात गुन्हेही दाखल झाले आहेत.दि.१९ नोव्हेबर रोजीच्या राञी अकराच्या सुमारास मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे महसुल विभागाने सापळा रचला आणी मंगरुळपीर शहरालगतच्याच पंचशिलनगर परिसरातुन एक राशनच्या तांदुळाने भरलेला ट्रक महसुल विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी पकडल्याची माहीती मिळाली आहे.तांदुळाचा पकडलेला हा ट्रक मंगरुळपीर पो.स्टे.ला आणला असुन हा तांदुळ कुठुन व कसा आला?किंवा हा तांदुळ राशनचा आहे का?सदर ट्रकमधील माल कुणाचा आहे?कुणाच्या सांगण्यावरुन नेमकी कुठे ही ट्रिप पाठवल्या जाणार होती?तसेच ट्रकमालक व ट्रकचालक याविषयीची माहीती घेवुन पो.स्टे.ला गुन्हा नोंद करणार असल्याचे सांगण्यात आले.या राशनतस्करीसंदर्भात पोलिस विभाग तपास करत आहे.या महसुल विभागाच्या कारवाईमुळे राशनतस्करांचे धाबे दणानले आहे.पकडलेल्या तादुळाचा साठा व जेथुन हा ट्रक पकडला त्या गोदामातील अवैध असणारे धान्यही शासनजमा करुन पुढील कारवाई सुरु असल्याचे समजले.

जप्त केलेला तांदुळसाठा केला शासनजमा

मंगरुपीर येथे दि.१९ च्याराञी अवैध तांदुळ भरत असताना ट्रॅक पकडण्यात आला असुन त्या ट्रॅकमध्ये ५००कट्टे तांदुळ व गोडावुन मध्ये १५०कट्टे तांदुळ व ६१ कट्टे गहु पकडण्यात आले.तपास करुन कार्यवाही सुरु आहे तर पकडलेले धान्य शासनजमा केल्याचे सांगण्यात आले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!