Post Views: 871
स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :/ खेड पंचायत समितीच्या उपसभापती यांनी ९ नोव्हेंबरला राजीनामा दिल्याने नवीन उपसभापती पदासाठी बिगुल वाजले आहे. त्यामुळे उपसभापती पदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.अशी माहिती पीठासीन अधिकारी प्रांत विक्रांत चव्हाण यांनी दिली.
पुढील महिन्यापासुन जिल्हा परिषदेची आचार संहिता चालूं होणार असुन त्या आधीच ही निवडणूक होणार असल्याचे सांगण्यात आले.तशी पत्रे बाकीच्या पंचायत समिती सदस्यांना देण्यात आली आहेत.त्यामुळे पुढील महिन्यात ही निवडणूक होण्याची शक्यता आहे.आता खेड पंचायत समितीच्या उपसभापती पदावर ही शेवटची निवड असल्याने कोणाची वर्णी लागणार हेच पाहावे लागेल.