Post Views: 368
प्रतिनिधी फुलचंद भगत :-
राशनतस्कराची मुजोरी,तांदुळाची पुन्हा तस्करी
राशनतस्करी करणारा ट्रक जेरबंद;मंगरुळपीर महसुल विभागाची कारवाई
मंगरुळपीर:-दि.१९ नाव्हेंबरच्या राञी अकराच्या सुमारास मंगरूळपीरचे एसडिओ व पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके यांनी तस्करी करणारा तांदूळाचा ट्रक ताब्यात घेतला असुन तपास करून कारवाई करणार असल्याने महसुल व पोलिस विभागाकडुन सांगण्यात आले आहे.
राशनतस्करीचे मंगरुळपीर हे विदर्भाचे हब म्हणून ओळखले जाते.याआधी महसुल विभागासह पोलिसविभागानेही अनेक यासंदर्भात कारवाया केल्या आहेत.काहीवर राशनतस्करीसंदर्भात गुन्हेही दाखल झाले आहेत.दि.१९ नोव्हेबर रोजीच्या राञी अकराच्या सुमारास मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे महसुल विभागाने सापळा रचला आणी मंगरुळपीर शहरालगतच्याच पंचशिलनगर परिसरातुन एक राशनच्या तांदुळाने भरलेला ट्रक महसुल विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी पकडल्याची माहीती मिळाली आहे.तांदुळाचा पकडलेला हा ट्रक मंगरुळपीर पो.स्टे.ला आणला असुन हा तांदुळ कुठुन व कसा आला?किंवा हा तांदुळ राशनचा आहे का?सदर ट्रकमधील माल कुणाचा आहे?कुणाच्या सांगण्यावरुन नेमकी कुठे ही ट्रिप पाठवल्या जाणार होती?तसेच ट्रकमालक व ट्रकचालक याविषयीची माहीती घेवुन तपास सुरु आहे.या राशनतस्करीसंदर्भात पोलिस विभाग तपास करत आहे.या महसुल विभागाच्या कारवाईमुळे राशनतस्करांचे धाबे दणानले आहे.