रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा याकरिता सातत्याने कल्याण लोकसभा मतदारसंघातील रेल्वे संबंधित पायाभूत सुविधांवर येणारा ताण तसेच रेल्वे प्रवाशांच्या मागण्यां व समस्यां जाणून घेऊन त्यावर उपाय योजना करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असताना रेल्वे प्रवाशांना विविध सेवा सुविधा पुरविण्यासाठी श्रीकांत शिंदे यांनी सतत पाठपुरावा करुन उभारण्यात आलेल्या विविध सेवा सुविधांचे ई-लोकार्पण आज रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या शुभ हस्ते पार पडले. तर प्रत्यक्ष ठिकाणी स्थानिक शिवसेना लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते या सर्व सेवां सुविधांचे लोकार्पण मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध रेल्वे स्थानकांवर आज लोकार्पण झालेल्या सेवा सुविधां खालीलप्रमाणे –
रेल्वे प्रवाशांना ठाकुर्ली स्थानकात ये-जा करणे सोयीचे व्हावे याकरिता पाठपुरावा करुन उभारण्यात आलेल्या पादचारी पूल नागरिकांच्या सेवेत रुजू.
कोपर स्थानकात होम प्लॅटफॉर्म उभारुन स्थानकात होणारी गर्दी विभाजनाचा प्रस्ताव पाठपुरावा करुन मंजूर करुन घेत त्याचे काम गति देऊन पूर्ण करत उभारण्यात आलेला कोपर स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे लोकार्पण.
अंबरनाथ स्थानकातील फलाट क्रमांक एक वर येणारा ताण लक्षात घेऊन नव्या होम प्लॅटफॉर्म साठी प्रयत्न करुन तो मंजूर करून घेतला. आज या अंबरनाथ स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे तसेच रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी पाठपुरावा करून नव्याने बांधलेल्या रेल्वे वरील पादचारी पुलाचे लोकार्पण संपन्न.
अनेक वर्षांपासून स्वयंचलित जिना बसविण्याच्या मागणीसाठी पाठपुरावा करुन विठ्ठलवाडी स्थानकात नव्याने बसविण्यात आलेले स्वयंचलित जिना नागरिकांच्या सेवेत दाखल.