दर्यापूरात वखार महामंडळाच्या वतीने “वखार आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन

दर्यापूर – महेश बुंदे

महाराष्ट्र राज्य वखार
महामंडळाच्या शेतमाल साठवणुकीच्या विविध योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांना व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, कृषी विभाग व महाराष्र्य सहकार विकास महामंडळ मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने वखार आपल्या दारी, महामंडळाचे वचन शेतमालाचे संरक्षण या अभियाना अंतर्गत शेतमाल तारण योजनेची शेतकऱ्यांना माहिती मिळावी या करिता दि. १८ नोव्हेंबर रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या दर्यापूर या वखार केंद्रावर करण्यात आलेले होते.

या कार्यक्रमाच्या निमित्याने महामंडळाची शेतकऱ्यांसाठी विशेष ऑनलाईन शेतमाल तारण कर्ज योजनेची माहिती देण्यात आली वखार महामंडळाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सहकार्याने पात्र शेतकरी ठेवीदारांना व शेतकरी उत्पादक कंपन्यांना गोदाम पावती वर नमूद साठवून शेतमालाच्या मूल्यांकनाच्या ७०% कर्ज उपलब्ध करून दिले जाते ठेवीदारांना प्रतक्ष्य कोणत्याही बँकेत न जाता कुठेही हेलपाटे न मारता गोदामातूनच ऑनलाईन अर्ज करून कर्ज मिळते.

शेतकऱ्यांना व शेतकरी उत्पादक कंपन्यांना ९% दराने शेतमाल तारण योजने अंतर्गत रु. ५ लाखापर्यंत व शेतकरी उत्पादक कंपन्यांना रु. ७५,००,००० लाखापर्यंत शेतमाल कर्ज तारण रक्कम २४ तासामध्ये त्यांचा खात्या वर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून RTGS द्वारे वर्ग करण्यात येते. हि अभिनव शेतमाल तारण कर्ज योजना महाराष्ट्रातील सर्व वखार केंद्रावर गोदामा मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आज मितेस ६०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी १४ कोटी पेक्षा जास्त कर्ज रक्कमेचे वितरण करण्यात आले आहे. असे विभागीय प्रमुख श्री. अजित मासाळ यांनी संगीतले.


शेतकरी बांधवांनी सोयाबीन व इतर पिकांच्या सुगीच्या काळात जास्तीत जास्त आवक झाल्यामुळे शेतमालाचे बाजारभाव कमी होतात त्यामुळे सुगीचा काळात शेतमालाची विक्री न करता शेतमालाची साठवणूक वखार महामंडळाच्या गोदामात करावी असे आव्हान. श्री. भाऊसाहेब टेमगर महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या वतीने केले व गोदाम बांधणीच्या सर्व शासकीय योजनांची माहिती दिली.

सदरच्या कार्यशाळेस श्री. रविकुमार बोडखे सा. प्रोग्रामर, श्री.भाऊसाहेब टेमगर सहकार विकास महामंडळाच्या गोदाम व्यवस्थापनाचे वरिष्ठ सल्लागार, श्री. योगेश बिडकर साठ अधिक्षक दर्यापूर , श्री. शाम गावंडे प्रत नियंत्रक, व शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. योगेश बिडकर, साठा अधीक्षक, दर्यापूर यांनी केले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!