दर्यापूर – महेश बुंदे.:-
गत १० दिवसांपासून विविध मागण्यांसाठी संपूर्ण महारास्ट्रामध्ये एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. या एसटी बंदचा फटका खाजगी व्यावसायिकांनाही बसत आहे. गत दहा दिवसांपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे दर्यापूर बसस्थानकात एकही बस फिरकली नाही. यामुळे दहा दिवसापासून दर्यापूर बस स्थानक रिकामेच आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, एसटी महामंडळ शासनामध्ये विलीन करून घ्यावे, कर्मचाऱ्यांना अन्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ द्यावा, या व अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा गत १० दिवसांपासून संप सुरू आहे. दिवसेंदिवस हा संप चिघळत आहे.
