Post Views: 797
५५ व ६५ किलो अशा दोन गटात एक लक्ष रुपयाच्या बक्षिसांची लयलूट
दर्यापूर- महेश बुंदे
दर्यापूर येथे संभाजी क्रीडा, कला व सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दि १६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी संपन्न झाला. या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ कवी डॉ सतीश तराळ तर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद वित्त व आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर उपस्थित होते.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून खरेदी विक्री संघाचे कार्यकारी अध्यक्ष गजाननराव जाधव, ठाणेदार प्रमेश आत्राम, सहाय्यक गटविकास अधिकारी सुधीर अरबट, दिलीपसिंग खामरे, अनिल वानखडे, सचिव बाळासाहेब टोळे, बाळकृष्ण खोडके, बंटी वाकपंजार, बाळू पाटील गावंडे, संजय देशमुख, तुळशीदास धांडे सर, अनिल विल्हेकर सर, श्री नवले सर, अनिल तराळ, शरद सारसे, बजरंग इंगळे, मंडळाचे अध्यक्ष अमोल पाटील गावंडे आदी उपस्थित होते. या भव्य कबड्डी स्पर्धेत राज्यातील नामवंत संघ सहभागी झाले असून ६६ किलो व ६५ किलो अशा दोन वजनी गटात एकूण एक लक्ष रुपयाच्या बक्षिसांची लयलूट विजेत्या संघावर होणार आहे. एक गाव-एक संघ या नियमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
विजेत्या संघाला ५५ किलो गटात प्रथम बक्षीस रुपये २१ हजार स्व. नारायणराव लाजूरकर स्मृती प्रित्यर्थ पुरुषोत्तमराव लाजूरकर यांच्या तर्फे, द्वितीय बक्षीस रुपये १५ हजार बु. गजाननराव देवीदासराव वाकपांजर यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री बंटीभाऊ साहेबराव वाकपांजर यांच्या तर्फे, तृतीय बक्षीस रुपये १० हजार स्व.शीला बाळकृष्ण खोडके यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणार आहे.
तसेच ६५ किलो वजनी गटात प्रथम बक्षीस रुपये २१ हजार स्व. विनोद पाटील तराळ स्मृती प्रित्यर्थ गोपाल अरबट व रवी गणोरकर यांच्या तर्फे, द्वितीय बक्षीस रुपये १५ हजार कस्तुरी नर्सरी व डी.एन.पाटील फाउंडेशन यांच्या तर्फे, तृतीय बक्षीस रुपये १० हजार स्व.सरलाबाई जयसिंग चव्हाण स्मृती प्रित्यर्थ दिनेशसिंग जयसिंग चव्हाण यांच्या तर्फे देण्यात येणार आहे. त्यासोबतच दोन्ही गटात उत्कृष्ट रेडर व उत्कृष्ट पकड याकरिता प्रत्येकी रुपये १ हजार असे चार बक्षिसे स्व.जयसिंग संपतसिंग चव्हाण स्मृती प्रित्यर्थ श्री.दिनेशसिंग जयसिंग चव्हाण व स्व.दामोदर गावंडे स्मृती प्रित्यर्थ जयदीपपाटील गावंडे यांच्या तर्फे देण्यात येणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव आल्हाद तराळ यांनी केले तर संचालन धनंजय देशमुख तर आभार प्रदर्शन निखिल बुंदीले यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सदस्य परिश्रम घेत आहेत.