दगडफेक करुन दुकानांची तोडफोड करणार्‍या आरोपिंवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल,आरोपिंना अटक

कारंजा लाड येथील घटना

प्रतिनिधी फुलचंद भगत:-

वाशिम:-पोलिस स्टेशन कारंजा शहर पोलिस स्टेशन अंतर्गत दिनांक 12/11/2021 रोजी फिर्यादी नामे गजानन जगदेव पारधी वय 32 वर्षे व्यवसाय कापड दुकाण रा.मानोरा रोड बायपास कारंजा यांनी पो.स्टे.ला.येवुन जबानी रिपोर्ट दिला की,एम.आय.एमचे कार्यकर्ते यांनी तहसिल कार्यालय कारंजा येथे निवेदन देवुन परीतीचे दरम्यान गैरकायदेशीर मंडळी जमवुन कारंजा शहरातील पुंजानी कॉम्प्लेक्स येथील फिर्यादी नामे गजानन जगदेव पारधी यांचे दुकानात घुसुन दगडफेक करून फिर्यादी यांना लाथा बुक्याने मारहान करून फिर्यादी याचे पोटात काच मारण्याचा प्रयत्न केले

व फिर्यादी यांचे शितल हॅन्डलुम दुकानातील सामानाची नासधुस केली अशा फिर्यादी यांचे जबानी रिपोर्ट वरून पो.स्टे.कारंजा शहर येथे अप कमांक 815/2021 307,143,149,294,427,143,149,भा.द.वि सहकलम
135 मु.पो.का. व कलम 7 कि अ. अॅक्ट गुन्हयातील अटक आरोपी 1) मोहम्मद वसीम मोहम्मद
इब्राहीम वय 40 वर्षे रा.महात्मा फुले चौक कारंजा 2) फिरोज कासम प्यारेवाले वय 38 वर्षे रा. गवळीपुरा कारंजा यांना दि.13/11/2021 रोजी अटक करून त्यांना आज रोजी मा.न्यायलय कारंजा समोर हजर केले असता न्यायलयाने आरोपी यांना मध्यवर्ती कारागृह वाशिम
येथे रवाना केले असुन आज दिनांक 13/11/2021 रोजी सदर गुन्हयात नविन निष्पण झालेले आरोपी नामे 1) साजीद अल्ली मुंजबील अल्ली 2 ) ईलीयाज खॉ अयुब खाँ 3 ) मोहम्मद समीर मो.आरीफ सर्व रा कारंजा यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली असुन सदर गुन्हयाचा तपास सुरू आहे.सदर गुन्हयाचा तपास पो.नि.आधारसिंग सोनोने पो.स्टे.कारंजा शहर करीत आहेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!