कोल्हापूर वार्ता :- पैसे देण्यास नकार दिल्याने तीन तरुणांनी केलेल्या तलवार हल्ल्यात रविवार पेठ येथील अक्षय रवींद्र माने (वय २५) हा गंभीर जखमी झाला आहे.डोक्यावर पाठीवर व पोटावर उर्मी हल्ला झाल्याने तरुणाची प्रकृती गंभीर बनली आहे. त्यास तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेनंतर संशयितांनी तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी आणि ८ हजार रुपयांची रोकड घेऊन पसार झाले.
कोल्हापूर परिसरात तणावाचे वातावरण
अंबाई टँक येथील मध्यवर्ती चौकात शनिवारी (दि.१८)दुपारी हा प्रकार घडल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले. दरम्यान काही काळ वातावरण तणावाचे बनले होते. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की अक्षय यादव याचे अंबाई टँक येथील मध्यवर्ती चौकात हॉटेल रेस्टॉरंट आहे. या भागात व्यवसाय करायचा असेल तर आम्हाला काही रक्कम द्यावी लागेल. असा तगादा तीन संशयितांनी आठवड्यापासून लावला होता. मात्र यादव याने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला.
दोन दिवसापूर्वी तसेच शुक्रवारी रात्री संशयित तरुण मद्यधुंद अवस्थेत यादव यांच्याकडे आले होते. पैसे देण्यास नकार दिला तर व्यवसाय करू देणार नाही शिवाय जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देण्यात आली. आज दुपारी बारा वाजता हातात तलवार घेऊन रेस्टॉरंटमध्ये आले त्यांनी थेट हॉटेल व्यावसायिकावर तलवार हल्ला केला. अक्षय गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला.
परिसरात नागरिकांनी त्यास तात्काळ शासकीय रुग्णालयात हलवले हल्लेखोराने होऊन जाताना यादव याच्या गळ्यातील सोनसाखळी आणि आठ हजाराची रोकड घेऊन पलायन केले. संशयित मंगळवार पेठ परिसरातील असल्याचे सांगण्यात आले तरुणावर झालेल्या जीवघेणे हल्ल्यामुळे कुटुंबीय नातेवाईक व अंबाई टँक परिसरातील तरुणांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता.