चाकण : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सलग्न खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने खेड तालुक्यातील विविध स्पर्धा परिक्षामध्ये नावीन्यपूर्ण यश मिळवणार्या गुणवंतांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात तालुक्यातील एकूण ८ गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न झाला.
खेड तालुक्यातील इतिहासात बहुतेक पहिल्यांदाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत अँड गोरक्ष लंघे, अँड. मिलिंद गाढवे व अँड रेवती बागडे यांनी नावीन्यपूर्ण यश संपादन करून जज पदाला गवसणी घातली आहे. त्यांच्याच बरोबर कुमारी ऋतुजा कोबल, विराज शिंदे, अर्चना टाकळकर, प्रणाली येवले, सलोनी बलदोटा यांनी सनदी लेखापाल परिक्षेत मोठे यश संपादन करून सनदी लेखापाल(CA) होण्याचा मान मिळवला आहे. याच निमित्ताने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सलग्न खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील विद्यार्थ्यानी उत्तुंग असे यश संपादन केले आहे. अन त्यांचा गुणगौरव करणे हे एक सामाजिक दायित्व समजून हा गौरव सोहळा आयोजित केला होता.
यावेळी या गौरव सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून खेड तालुक्यातील नामवंत सनदी लेखापाल निलेश रेटवडे यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळि त्यांनी बोलताना सांगितले की, खेड पत्रकार संघाच्या कडून जो आजचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यातून नक्कीच इतरही विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल. यातून नक्कीच भरकटत चाललेली युवा पिढी आपल्या भवितव्याचा विचार करून अशा परिक्षाच्या माध्यमातून आपले नाव उज्जल करतील. त्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना अँड. गोरक्ष लंघे यांनी सांगितले की, आज खेड पत्रकार संघाच्या माध्यमातून जो सत्कार करण्यात आला तो आमचा फक्त सत्कार नसून त्यातून आम्हाला नक्कीच एक सामाजिक प्रेरणा भेटेल. त्याचा उपयोग आम्ही आमच्या कामाच्या माध्यमातून समाजप्रती करू असे अँड गोरक्ष लंघे यांनी सांगितले.
या गुणगौरव सोहळ्यावेळी अँड रेवती बागडे, ऋतुजा कोबल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक यांनीही विद्यार्थ्यांना हे यश संपादन करण्यासाठी किती अडचणी व किती संघर्ष करावा लागला याबद्दल सविस्तर विशद केले.
या गुणगौरव सोहळ्याच्या निमित्ताने खेड तालुका पत्रकार संघाचे संघटक प्रभात वृतपत्राचे पत्रकार सुनील बटवाल यांची युवा क्रांति फाऊंडेशन अंतेर्गत, पोलिस मित्र ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या खेड तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे नियोजन खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सम्राट राऊत, उपाध्यक्ष विश्वनाथ केसवड, सचिव अँड. प्रीतम शिंदे, संघाचे खजिनदार नितिन सैद, कार्याध्यक्ष अनिकेत गोरे, संघटक लहू लांडे यांनी केले होते. यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव व भगिनी उपस्थित होते.