प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- चाकण पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या रासे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या शौचालायची दयनीय अवस्था झालेली पाहायला मिळत आहे.यामुळे गावातील बापदेव वस्ती या ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थ्यांना उघडयावर बसण्याची वेळ आली आहे.
रासे गावातील बापदेव वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेचे इयत्ता 1 ते 4 पर्यंत ते वर्ग आहेत. या शाळेत 14 मुले व 15 मुली असा एकूण 29 विध्यार्थी शिक्षण घेत आहेत.परंतु शाळेतील विध्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या शौचालायची अत्यंत दयनीय अवस्था झालेली पाहायला मिळत आहे. या बांधण्यात आलेल्या शौचालयाची दरवाजे तुटले असुन पत्रे उडून गेले आहेत.तसेच शौचालयात कोणतीही पाण्याची सोय नसून सगळीकडे कचरा व घाण साचलेली दिसुन येत आहेत.त्यामुळे ज्या शाळेत विध्यार्थ्यांना धडे गिरवले जातात,जिथे जीवनाचा पाया रोवला जातो त्यांना शौचालयाला, व लघु-शंकेला बाहेर उघडयावर बसावे लागत असलेले पाहायला मिळत आहे.
त्यामुळे आता तरी तालुक्यातील अशा शाळांकडे पुणे जिल्हा परिषद लक्ष देणार का???? विध्यार्थ्यांना असेच उघडयावर शौचालयासाठी बसायला लावणार हेच पाहावे लागेल.