प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे ;- खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील मावळ भागातील शिवे गावातील नुतन सोसायटीच्या इमारतीचे उद्घाटन सोहळा खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील ,पुणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे व विविध मान्यवरांच्या हस्ते रविवार दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी पार पडला.अनेक वर्षानंतर बांधण्यात आलेल्या सोसायटी नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी गावातील अनेक शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
शिवे गावातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेल्या शिवे विविध कार्यकारी सेवा संस्था गेल्या अनेक वर्षांपासून गावात कार्यरत आहेत. परंतु संस्थेला एक चांगली इमारत व त्यासाठी जागा उपलब्ध होत नव्हती.अखेर नुतन इमारतीचा बांधकामाचा प्रस्ताव विद्यमान संचालक मंडळांनी बैठकीत घेतला होता.त्याचे सर्व संचालक मंडळांनी दुजोरा दिल्याने संस्थेच्या निधीतुन 6 लक्ष 72 हजार रुपयांचा निधी इमारतीच्या बांधकामासाठी मंजुर करण्यात आला होता.शिवे विविध कार्यकारी संस्थेने स्थबळावर 550 स्केअर फुटाची अशी सुसज्ज इमारत उभी केली.त्यामुळे शिवे गावातील शेतकऱ्यांना सोसायटी कामासाठी सोय होणार आहे.
यावेळी कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, अतुलभाऊ देशमुख,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुण चांभारे, अमोल पानंमंद,पुणे जिल्हा मध्यवर्ती शाखा शिवे बँकेचे मॅनेजर बबनराव पाचपुते, माजी उपसभापती चांगदेव शिवेंकर, माजी पंचायत समिती सदस्य रोहिदास गडदे,सरपंच ज्ञानेश्वर शिवेंकर, सोसायटी संचालक मंडळ,व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.