
हिंदू जननायक मराठी ह्रदयसम्राट राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार भोंग्यांसंदर्भातील पत्र घरोघरी पोचवण्यासाठी मनसे जनहित कक्ष खेड तालुक्याच्या वतीने आज तालूक्यातील गावागावांमध्ये हा उपक्रम चालू केला आहे.

आज सांगुर्डी,कान्हेवाडी येलवाडी या गावांमध्ये पत्रक वाटायला सुरुवात झाली आहे.यात मनसे जनहित कक्ष खेड तालुकाध्यक्ष पै.विवेक येवले पाटील व सचिव श्री.सतीश पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच मनसे जनहित कक्ष खेड तालुका उपाध्यक्ष श्री.संतोष पवार, मनसे जनहित कक्ष मावळ तालुका उपाध्यक्ष प्रथमेश वीर, मनसे कार्यकर्ते तुकाराम भसे व सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल भसे पाटिल यांनी पत्र वाटप केले.

येत्या पाच दिवसात तालूक्यातील बरीच गावे पूर्ण होतील व राजसाहेब ठाकरे यांचे विचार घराघरात पोहचतील.


