स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे : खेड तालुक्यातील चाकण जवळ असलेल्या आंबेठाण गावातील लांडगे वस्तीवर गट नंबर २३२ मध्ये एका खाजगी व्यक्तीने खड्डा उकरून ठेवला असता त्यात, खेळता खेळता ३ भावडांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज घडली.
बिहार येथील किशोर दास यांचे कुटूंब कामाच्या निमित्ताने लांडगे वस्ती येथे भाड्याने राहत होते. त्यांचे हे मृत्यू पावलेले तीन अपत्य होते.किशोर दास हे मूळ बिहार राज्यातील रहिवाशी आहेत. ते पेंटर काम करून उदर्निवाह करतात. त्यांना एकूण चार अपत्य आहेत. त्यातील रोहित दास (वय -८), राकेश दास (वय -६), श्वेता दास (वय -४) असे मयत झालेल्या मुलांची नावे आहेत.
एका बेजबाबदार व्यक्तीने हा खड्डा करून ठेवल्याने हा मोठा अनर्थ झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.आता या व्यक्तीवर पोलीस प्रशासन काय कडक कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.घटनास्थळी मदत कार्य टिम व महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस प्रशासन दाखल झाले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी वाय. सी. एम हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाळुंगे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
