पिंपरी चिंचवड शहराच्या पहिल्या महिला आमदार व भारतीय जनता पार्टीच्या जेष्ठ निष्ठावंत नेत्या आमदार उमा खापरे या आमदार झाल्यावर प्रथमच पिंपरी चिंचवड शहरात येत आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुरूवार दिनांक २३ जून २०२२ रोजी खालिलप्रमाणे त्यांच्या स्वागत सत्कारांचे नियोजन करण्यात आले आहे.
१) दुपारी ३ वाजता भक्ती शक्ती चौक ते पक्ष कार्यालय भव्य रैली.
२) दुपारी ४ वाजता भाजपा शहर कार्यालय मोरवाडी येथे पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे व सर्व प्रमुख पदाधिकारी स्वागत करतील.
३) सायंकाळी ७ ते ९ आमदार उमा खापरे यांच्या निवासस्थानी विजयाचा जल्लोष कार्यक्रम.