चाकण -तळेगाव रस्त्यावर खराबवाडी गावातील जय मल्हार हॉटेलच्या समोर इलेट्रॉ-पीम्यॅटिक कंपनीच्या जवळ एका दुचाकीवर रस्त्याच्या कडेचे झाड पडून दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला तर, एक गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याच्या कड़ेची झाडें काढण्यासाठी कळवूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे साप कानाडोळा करत असल्याने या झाडांच्यामुळे अशा निष्पाप व्यक्तींना आपला जीव गमवावा लागत आहे. कामावरून परतत असताना या दुचाकी स्वरावर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्ती केली जात आहे.
अपघात स्थळी महाळुंगे वाहतूक विभाग व महाळुंगे पोलीस चौकीचे कर्मचारी दाखल झाले आहेत. वाहतूक विभागाने वाहतूक सुरळीत केली आहे. घटनास्थळी तात्काळ म्हाळुंगे पोलीस चौकीचे कर्मचारी विठ्ठल वडेकर, अभिजित भोर, प्रितम ढमढेरे,श्रीधर इचके तसेच वाहतूक विभागाचे विलास तळपे, प्रमोद भोजने, स्वप्निल दौंडकर उपस्थित होऊन जखमीना मदत करून रुग्णालयात दाखल केले. जखमीची प्रकृतीही चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुढील तपास म्हाळुंगे पोलीस करत आहेत.