दर्यापूर – महेश बुंदे
सद्गुरू जिनिंग प्रेसिंग प्रा. लिमिटेडमध्ये दि २ नोव्हेंबर रोजी कापूस खरेदीला शुभारंभ करण्यात आला असून आजपर्यंत दर्यापूर तालुक्यातील सर्वच्च भाव ८९२१ रुपयांनी कापूस खरेदीला सुरवात झाली आहे. आज धनत्रयोदशी कापूस खरेदीला सुरवात झाली असल्याने चांगला भाव आपल्या कापसाला मिळणार म्हणून शेतकऱ्यांनी आपला माल मोठ्या प्रमाणावर सदगुरू जिनिग व प्रेसिंगमध्ये विकण्यासाठी आणला होता. शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केल्यामुळे या जिनिग व प्रेसिंग मध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर आपला माल घेऊन आले असल्याचे दिसून आले.
