पिंपरी चिंचवड वार्ता:- “सामाजिक सुरक्षा विभाग यांचे पथकाने “ड्राय डे” चे उल्लंघन करुन विनापरवाना अवैधरित्या देशी-विदेशी दारुच्या व बियरच्या बाटल्या ताब्यात बाळगुन त्याची गि-हाईकास विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई केलेबाबत. “
मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी “ड्राय डे” असल्यामुळे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये नियमाचे उल्लंघन करुन अवैधरित्या दारुची विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने सामाजिक सुरक्षा पथक हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये नियमांचे उल्लंघन करुन अवैधरित्या दारुची विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गोपनिय माहिती काढत असताना दिनांक १४/०४/२०२२ रोजी भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत तसेच दिघी पोलीस स्टेशन हद्दीत विनापरवाना अवैधरित्या स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी देशी-विदेशी दारुच्या व बियरच्या बाटल्या ताब्यात बाळगुन त्याची गिन्हाईकास विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक १४/०४/२०२२ रोजी सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत मोशी टोल नाका, गायकवाड वस्ती, मोशी, पुणे येथील हॉटेल तुळजाभवानी व्हेज नॉनव्हेज चा मालक नामे विजय गायकवाड हा त्याच्या हॉटेलमध्ये स्वतःचे •आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना अवैधरित्या देशी-विदेशी दारुच्या व बियरच्या बाटल्या ताब्यात बाळगुन त्याची विक्री करीत आहे.
अशी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या गोपनिय माहितीवरून सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत सापळा रचुन ११:०० वाजता छापा टाकुन आरोपीच्या ताब्यातुन खालील मुद्देमाल ताब्यात घेतला त्याचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.
१) ४,५००/- रु रोख रक्कम २) २.८०,२२०/- रु कि च्या देशी-विदेशी दारुच्या व बियरच्या बाटल्या.असा एकुण २,८४,७२०/- रु कि चा मुद्देमाल मिळुन आला आहे.
यात आरोपी इसम १) अंगद अशोक रक्ताटे वय २७ वर्षे रा. मोशी टोलनाका पुणे-नाशिक हायवे, गायकवाड वस्ती, मोशी, पुणे (हॉटेल मॅनेजर) पाहिजे आरोपी नामे २) विजय दशरथ गायकवाड वय ५० वर्षे रा. गायकवाड वस्ती, मोशी, पुणे (हॉटेल चालक-मालक ) तसेच पाहिजे आरोपी नामे ३) अल्कोड्रिंक्स वाईन्स शॉपी, जाधववाडी, पुणे (चालक-मालक) यांनी आरोपी क्रमांक ०२ यांना अटी शर्तीचे उल्लंघन करून प्रमाणापेक्षा जास्त देशी विदेशी दारुच्या व बियरच्या बाटल्या पुरविल्या म्हणुन त्यांचेविरूविरुद्ध भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुरन २२२/२०२२ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५(ई).८२.८३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.
तसेच दिनांक १४/०४/२०२२ रोजी सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दिघी पोलीस स्टेशन हद्दीत पुणे-आळंदी रोड, गेस्ट हाऊस समोर, चोली बुद्रुक ता. हवेली जि. पुणे येथील कुणाल गार्डन फॅमिली रेस्टॉरन्ट व्हेज नॉनव्हेज हॉटेलमध्ये इसम नामे विशाल शेट्टी हा स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना अवैधरित्या देशी-विदेशी दारूच्या व बियरच्या बाटल्या ताब्यात बाळगुन त्याची
गिन्हाईकास विक्री करीत आहे. अशी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या गोपनिय माहितीवरून सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंगलदार यांनी दिघी पोलीस स्टेशन हद्दीत सापळा रचुन १६:०० वाजता छापा टाकुन आरोपीच्या ताब्यातून खालील मुद्देमाल ताब्यात घेतला त्याचे वर्णन खालीलप्रमाणे आहे.
१) १७,२६५/- रु.कि च्या देशी-विदेशी दारुच्या १२२ बाटल्या. २) २,०४०/- रु रोख रक्कम,असा एकुण १९,३०५/- रु कि चा मुद्देमाल मिळुन आला म्हणुन
यात इसम नामे १) विशाल रविंद्र शेट्टी वय २६ वर्षे रा. शामा इस्टेट, फ्लॅट नंबर ६०२ बि विंग, चन्होली बुद्रुक ता. हवेली जि. पुणे (हॉटेल चालक-मालक) यांचेविरुध्द दिघी पोलीस स्टेशन येथे गुरनं १४३ / २०२२ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास दिघी पोलीस स्टेशन करीत आहे.
वरील दोन्ही कारवाईमध्ये एकुण ३,०४,०२५/- रुकिंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
