कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते ५ लाख मुदतठेव प्रमाणपत्रांचे वाटप

कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते ५ लाख मुदतठेव प्रमाणपत्रांचे वाटप निरीक्षणगृह- बालगृहातील विद्यार्थिनींच्या कलाकृती  प्रदर्शनाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभमुलांच्या कौशल्य विकासासाठी यापुढे मोठ्या स्वरूपात उपक्रम

  • महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर

– उपक्रमाबाबत राज्यस्तरावर धोरण आखणार

– ५३ योजनांचे पुनर्मुल्यांकन

अमरावती प्रतिनिधी ओम मोरे


निरीक्षणगृह व बालगृहातील मुलींनी प्रशिक्षण घेऊन कल्पकता व मेहनतीच्या बळावर सुंदर कलात्मक वस्तू तयार केल्या. या मुलांच्या कौशल्यांचा विकास घडवणे, मानसिक बळ व सकारात्मकता वाढविणे यासाठी प्रदर्शनाचा उपक्रम प्रायोगिक तत्वावर हाती घेतला.

ही प्रायोगिक तत्वावरील तथापि, महत्वपूर्ण सुरुवात आहे. पुढील वर्षी हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येईल व यादृष्टीने राज्यस्तरावर धोरणही आखण्यात येईल , असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.शासकीय मुलीचे निरीक्षणगृह व बालगृह येथील विद्यार्थिनींनी हस्तकलेद्वारे तयार केलेल्या उत्तमोत्तम वस्तूंचे प्रदर्शन व विक्री प्रदर्शनाचा शुभारंभ आज सकाळी बचतभवनात झाला.

हे प्रदर्शन उद्याही खुले राहील. जि. प. महिला व बालकल्याण सभापती पूजा आमले, अप्पर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी,  महिला व बालविकास उपायुक्त शिंगणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, पालकमंत्र्यांचे ओएसडी प्रमोद कापडे, बालविकास प्रकल्प अधिकारी राजश्री कोलखेडे, अतुल भडंगे, दिलीप काळे, विधी अधिकारी सीमा भाकरे, अनिरुद्ध पाटील आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हयात कोविड-१९ ने दोन्ही पालक मृत्यु पावलेल्या १० अनाथ बालकाना प्रत्येकी ५ लाखाचे मुदतठेव प्रमाणपत्राचे वितरण यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की,
निरीक्षणगृह व बालगृहातील मुलांच्या कौशल्य विकासाला वाव मिळण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. येथील मुलांना आठवड्यातून एकदा तरी खुल्या वातावरणाचा अनुभव मिळावा, यासाठी पुरेशी सुरक्षितता व मैदाने, बाग आदी सुविधा असलेल्या सीआरपीएफसारख्या कॅम्पसमध्ये भेट अशाप्रकारचा उपक्रम सुरू करण्याचा विचार आहे.

महिला व बालविकास विभागाकडून जिल्ह्यात महिला व बालविकास भवन सुरू करण्यात आले. वर्किंग वूमन हॉस्टेल सुरू करण्यात येत आहे. महिला नागरिकांच्या सोयीसाठी महिला आयोग व बालहक्क आयोगाचे कार्यालय विभागीय आयुक्तालयाच्या इमारतीत  स्थलांतरित करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले.

श्री. शिंगणे म्हणाले की, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ऍड. ठाकूर यांच्या संकल्पनेतून प्रायोगिक तत्वावर येथील निरीक्षणगृह व बालगृहातील विद्यार्थिनींना ‘आर्ट अँड क्राफ्ट’चे २ महिन्याचे प्रशिक्षण घेण्यात आले. संस्थेतील प्रवेशिताच्या कलागुणाना वाव मिळावा तसेच त्यांना भविष्यात स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. गत दोन वर्षांपासून महिला व बालविकास विभागाकडून अनेक महत्वपूर्ण राबविण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.कोविडकाळात चारशे मुलांना आतापर्यंत पाच लाख रुपये निधी देण्यात आला आहे. कोविडकाळात विधवा झालेल्या भगिनींना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला. मंत्री श्रीमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ‘मिशन वात्सल्य’सारख्या योजना हाती घेतानाच महिला व बालविकास विभागाच्या ५३ योजनांचे पुनर्मुल्यांकन होत असून, आवश्यक निधीही प्राप्त होत आहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले. प्रदर्शनात दिवाळीसाठी सजावटीच्या अनेकविध वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!