पुणे रिंग रोड पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या जमीन संपादनाच्या विरोधात शेतकरी आक्रमक ; शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल

खेड राजगुरूनगर | पुणे रिंग रोड आणि पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या जमीन संपादनाच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत.

विरोध तीव्र असल्याने शेतकऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये 24 जणांना खेड पोलिसांनी अटक केली आहे. यात 12 महिलांचाही समावेश आहे. पुणे रिंग रोड आणि पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या जमीन संपादनाला तीव्र विरोध आहे. या प्रकल्पाचा विरोध करत खेड तालुक्यातील 12 गावच्या शेतकऱ्यांसह महिलांनी खेड उपविभागीय कार्यालयावर दि. 8 एप्रिल2022 रोजी सकाळी 11 वाजता धडक मोर्चा काढला, बागायती जमिनी वगळून तसेच जमिनीला योग्य बाजारभाव मिळाला तरच जमिनीची मोजणी करावी, या मागणीसाठी चार तासांच्या मोर्चात शेतकऱ्यांनी खेड प्रांताधिकारी कार्यालयात आपला मोर्चा काढला.

राजगुरुनगर पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांची धरपकड करत लाठीमार केला. यामध्ये 24 शेतकऱ्यांसह महिलांना अटक करण्यात आली आहे. याबरोबरच आंदोलकांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी सर्वांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

आळंदी, चिंबळी, मोई, मरकळ परिसरातील शेतकरी भूमिहिन होत असताना तुटपुंज्या शेतीवर प्रकल्प कशासाठी, असा सवाल या शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच केला आहे. ‘पुणे नाशिक रेल्वे, रिंग रोड हटावा शेतकरी बचाव’ असा नारा देत प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी आंदोलनही पुकारले होते. रक्त सांडले तरी प्रकल्पाला जमिनी देणार नाही अशी भूमिका प्रकल्पग्रस्त शेतकरी घेत आहे.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक सतिशकुमार गुरव, उपनिरीक्षक राहुल लाड व मोजका पोलीस फौजफाटा प्रयत्न करीत होते. पण आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर तासाभराने केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पथक पाचारण करण्यात आले. त्यानंतर थेट आंदोलकांना उचलून गाड्यांमध्ये बसवणे. आणि जे ऐकणार नाहीत, अशांवर लाठीमार सुरू केला. काहीच वेळात सर्व आंदोलकांना बाहेर काढून अटक करण्यात आली.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!