कास्को बॉल क्रिकेट स्पर्धेत सुपर-३० इलेव्हन संघ ठरला विजेता

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांच्या हस्ते बक्षीस वितरण

प्रतिनिधी ओम मोरे

अमरावती ०५ एप्रिल : श्रमसाफल्य अभियंता क्रीडांगण विकास समितीच्या वतीने आगामी काळात सर्वोत्तम क्रीडापटू यांच्या जडणघडण व्हावी. याकरिता मैदानाची निर्मिती करण्यासह सातत्याने देखरेख व प्रयत्नांची मालिका राबविण्यात येत आहे. हे कार्य निश्चितच प्रशंसनीय व अनुकरणीय आहे. मैदानी खेळ हे शारीरिक तंदुरुस्ती अबाधीत राखण्यासाठी सदैव महत्वपूर्ण ठरणारी आहे.हे मैदान विकसित करणे व स्थानिकांना अपेक्षित क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी समितीच्या ज्या बाबी सुचविण्यात येतील.

त्याचा आदर करीत सर्व शक्यप्राय प्रयत्न करीत आपण प्राधान्याने सहकार्य करून स्थानिकांचे मागण्यांची पूर्तता करू. यश-अपयश हा खेळाडू वृत्ती वाढीस लागण्यासाठी क्रीडापटूंना त्यांच्या जीवनात कलाटणी देणारा क्षण आहे. अपयशाने खचून न जाता यश गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत क्रीडापटूंनी आपले ईप्सित साध्य करावे. विजेता व उपविजेता दोन्हीही संघाचे अभिनंदन करण्यासह क्रीडापटूंना भविष्यातील उज्वल शुभेच्छा देण्यासह क्रीडा क्षेत्र व क्रीडापटू च्या विकासाला आपले सर्वतोपरी प्राधान्य आहे. या शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष-संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधित केले.श्रमसाफल्य अभियंता कॉलोनी स्थित भव्य रात्रकालीन कास्को टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २०२२ बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष-प्रशांत डवरे, माजी महापौर-ऍड. किशोर शेळके, माजी नगरसेवक-अविनाश मार्डीकर, जितेंद्रसिंह ठाकूर, डॉ. प्रविण अवघड,,संजीव कथलकर,अनिल ठाकरे, श्रीकृष्ण टोंगसे, विजय चौधरी, ऍड. रामेकर, सुमीत इंगोले, किर्तीमाला चौधरी, माधुरी चौहान, आदी उपस्थित होते. यावेळी समितीच्या वतीने संजय खोडके यांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान अंतिम लढत ही मॉर्निंग क्रिकेट क्लब व सुपर–३० इलेव्हन या दोन संघात झाली. यावेळी ८ गडी राखून सुपर-३० इलेव्हन संघाने विजय संपादित केला. सरस कामगिरी बजावीत जेतेपद पटकाविणारा सुपर-३० इलेव्हन संघाला ३१ हजार रुपये व चषक तसेच उपविजेता ठरलेल्या मॉर्निग क्रिकेट क्लब या चमूला २१ हजार रुपये व चषक वितरण करीत संजय खोडके यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रशांत डवरे यांनी आपल्या प्रास्ताविकादरम्यान स्थानिक समितीच्या वतीने मैदान निर्मिती करण्यासह विकसित करण्यासाठी केले जाणारे कार्य हे एक अमूल्य कार्य आहे. या मैदानाचे विकासासाठी रुपये -२५ लक्ष निधि उपलब्ध करून देत आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी दर्जेदार क्रीडापटू निर्माण होण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे. या मैदानाचे धर्तीवर प्रभागा-प्रभागात मैदानावर क्रीडा विषयक सुविधा उपलब्ध करून देण्याला घेऊन खोडके दाम्पत्याचे वतीने स्थानिकांना सहकार्य करण्यासह प्रोत्साहन सुद्धा दिल्या जात आहे. असे सांगितले.यादरम्यान संजय खोडके यांच्या सोबतच अन्य अतिथींचे हस्ते – मॅन ऑफ दी मॅच-अजिंक्य देशमुख, मॅन ऑफ दि सिरीज-शिवम देशमुख,बेस्ट बॉलर-सुशील राऊत, बेस्ट बॅट्समन-अजिंक्य देशमुख, यांना गौरविण्यात आले.

यावेळी पंच व समालोचन करणाऱयांचा पण यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी विशाल देशमुख, आकाश हिवसे पाटील, प्रथमेश बोके, संकेत निंम्भोरकर, सचिन दळवी पाटील, अजिंक्य देशमुख, सचिन उर्फ छोटू खंडारे, प्रतापराव देशमुख, राजेश बर्वे, योगेश सवई, नितीन भेटाळू, चेतन ठाकूर, प्रशांत पेठे, बंडू निंभोरकर, प्रवीण भोरे, संदीप सावरकर, विशाल भगत, सुयोग तायडे, आकाश वडणेरकर, स्वप्निल धोटे, आदींसह श्रमसाफल्य अभियंता क्रीडांगण विकास समिती व श्री क्रिकेट एकेडमी चे सर्व सदस्य व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-संदीप जुनघरे यांनी केले. तर कार्यक्रमांती सर्व उपस्थितांचे छोटू खंडारे यांनी आभार मानले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!