सिलेंंडरला हार घालुन फटाके फोडले,जिल्हाभरात युवासेनेचेे आंदोलन
प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम – पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल, डाळी अशा सर्वच गोष्टीचे दर दररोज वाढत आहेत. सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. इंधन दरवाढ करुन महागाई वाढवून सर्वसामान्य जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणार्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार राहीलेला नाही.
म्हणून वाढत्या महागाईबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करण्यासाठी युवासेनाप्रमुख ना. आदित्य ठाकरे, युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशाने आणि खासदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वात व युवासेना जिल्हाप्रमुख रवि भांदुर्गे यांच्या मार्गदर्शनात ३ एप्रिल रोजी स्थानिक पाटणी चौेकात युवासेना जिल्हयाच्या वतीने थाळी व ताली बजाव आंदोलन करण्यात आले.
