वाशिम:-शहरी तसेच ग्रामीण भागातील आदिवासी, विधवा, निराधार व प्रगतीच्या वाटेवर चालू पाहणाऱ्या महिलांना शिवणकाम सोबतच विविध पूरक उद्योगांचे प्रशिक्षण देवून महिलांना स्वयंपुर्ण बनवून शेकडो महिलांना स्वयंरोजगार ऊपलब्ध करुन अनेक महिलांच्या ऊसवलेल्या जिवनाला शिलाई मारून पुन्हा नव्या जोमाने जीवन जगण्याचे बळ देणार्या मंगरूळपीर येथील महानंदा अगुलदरे असुन त्यांच्या या गेल्या बावीस वर्षाच्या कार्याचे सर्वञ कौतुक होत आहे.
महानंदा अगुलदरे यांनी तिन वर्षापुर्वी सुरु केलेल्या संत ज्ञानेश्वर माऊली प्रतिष्ठाण नविन सोनखास व्दारा संचालित ‘पुनम महिला शिवणकला केद्र’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून शहरी तसेच ग्रामीण भागातील मुली तसेच महिलांना आर्थिक प्रगतीची दिशा दाखवली आहे.ग्रामीण भागातील महिला तसेच मुलींना गावामध्येच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महानंदा अगुलदरे यांनी आपल्या संस्थेव्दारा फॅशन डिझायनिंग आणी शिवणकला गावांपर्यंत पोचविल्या आहेत आणी शिवणकाम तसेच बेकरी आदींचे प्रशिक्षण देवुन त्याचा चांगला फायदा मुली आणि महिलांच्या आर्थिक प्रगतीमध्ये दिसून येत आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील खडीधामणी माहेर असलेल्या आणी साखरडोह या छोट्या गावचे सासर असणार्या आदीवासी कुटुंबातील महानंदा सध्या मंगरुळपीर येथील नविन सोनखास येथे स्थाईक झाल्या आहेत. महानंदाताई यांनी लग्नानंतर पुढचे शिक्षण घेतले.पती शिक्षकी पेशातले असल्याने शिक्षणाचे महत्व त्यांच्याही मनी भिनले होते.आपल्या शिक्षणाचा ऊपयोग तळागाळातील लोकांना व्हावा यासाठी त्या वेळोवेळी मार्गदर्शन करत.अनेक गरजु महिला आर्थीक परिस्थीतीअभावी जीवनाशी झुंज देत असल्याचे त्यांनी जवळून अनूभवले.या महिलांना स्वयंबळावर ऊभे करण्याचा माणस डोळ्यापुढे ठेवून त्यांनी तिन वर्षापुर्वी पुनम महिला शिवणकला केंद्र या संस्थेची स्थापना केली.
सुरवातीला महानंदाताईंनी साडी सेंटर व लेडिज मटेरिअलचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला, मात्र या वेळी त्यांना काहीतरी वेगळे करावेसे वाटत होते. वैयक्तिक व्यवसायाबरोबरच समाजातील गरजू महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांनी या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली.संत ज्ञानेश्वर माऊली प्रतिष्ठाण नविन सोनखास मंगरुळपीर व्दारा ‘पुनम महिला शिवणकला केंद्र’ या संस्थेअंतर्गत ब्युटीपार्लर,शिवणकाम,बेकरी ट्रेनिंग घेवुन अनेक महिलांना स्वयंरोजगारासाठी बळ दिले.यासोबतच संस्थेअंतर्गत महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्याही साजर्या करत अनेक सामाजिक ऊपक्रमही राबवुन आपलं समाजाचं काही देणं लागते या प्रगल्भ विचारसरणीतुन कार्य करीत गेल्या.प्रबोधनात्मक आणी वैचारिक वारसा जोपासत महापुरुषांची विचारधारा अनूसरुन आपली आणी कुटुंबांची प्रगती साधन्याचा महानंदा यांनी महिलांना कानमंञही दिला.महिलांकडून ब्युटीपार्लर, शिवणकाम अशा अभ्यासक्रमांची विचारणा होऊ लागली. त्यानुसार त्यांनी शिवण काम आणि ब्युटीपार्लरचे आणी बेकरी ट्रेनिंगचे अभ्यासक्रम सुरू केले. संस्थेने सुरू केलेले हे उपक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाले.
महिलांसाठी प्रशिक्षणाची सोय
संस्थेकडे वेगवेगळे कोर्स करण्यासाठी येणाऱ्या महिला प्रामुख्याने विधवा, शिक्षण अर्धवट राहिलेल्या, कौटुंबिक व आर्थिक अडचणीग्रस्त असायच्या. त्यांच्याकडे फी भरण्यासाठीही पुरेसे पैसे नसायचे. तरीही कमी फी, सवलत व प्रसंगी मोफत प्रशिक्षण देऊन महानंदाताईंनी महिलांना उद्योगास प्रवृत्त केले. यातून मंगरुळपीर तालुक्यात महिला सक्षमीकरणाची चळवळ उभी राहिली. गरजू महिलांना प्रशिक्षित करत असताना प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र मिळाल्याने व्यवसाय कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. कमी वेळात ग्रामीण भागात महिलांचे पूरक व्यवसाय अधिक सक्षमपणे उभे राहण्यास सुरवात झाली.
महिला झाल्या स्वयंपूर्ण
पुनम महिला शिवणकला केद्र या संस्थेमार्फत अनेक महिलांना शासकीय योजनांचा लाभ देणे शक्य होण्यासाठी ड्रेस डिझायनिंग तसेच बेकरी व्यवसायाचे ट्रेनिंग लावून शासनाच्या नियमांप्रमाणे सर्व व्यवस्था, वस्तू, उपकरणे, जागा असलेली सुसज्ज इन्स्टिट्यूट मंगरुळपीर येथे महानंदा अगुलदले यांनी उभी केली. या जागेत रोज महिला खेड्यापाड्यातून येऊन प्रशिक्षण घेतात. अनेक महिला खेडेगाव, शहरात चांगल्या प्रकारे काम करून कुटुंबाला हातभार लावत आहेत.
शक्य तेव्हा संस्थेचे सदस्य आदिवासी महिलांना त्यांच्या गावात जाऊन प्रशिक्षण देतात. गावात आणि आजूबाजूच्या परिसरातील वाडी, पाडे, वस्तीवरील महिलांनी संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. संस्थेच्या आतापर्यतच्या उपक्रमांचा ग्रामीण महिलांना चांगला फायदा झाला आहे.महिलांना रोजगार ऊभारणीसाठीही शासकीय योजनांची माहीती देवून निधी महिलांसाठी मिळवून दिला.
त्यातून ग्रामीण भागातील महिला, मुली स्वावलंबी झाल्या.पुढील काळात आदिवासी महिलांना बांबू कारागिरी, मेणबत्ती, अगरबत्ती, वनउपज, मसाले, पापड, लोणचे प्रशिक्षण, शोभेच्या वस्तू निर्मिती, वारली पेंटिंगचे प्रशिक्षण आदींविषयी प्रशिक्षणाची सुरुवात संस्थेअंतर्गत सुरु करण्याचा मानस महानंदाताईंनी बोलुन दाखवला आणी सोबतच उत्पादनांच्या विक्रीला साहाय्यही करणार असल्याचे सांगीतले.आतापर्यत सुमारे ८५० हून अधिक मुलींना शिवणकाम तसेच ड्रेस डिझायनिंगचे प्रशिक्षण घेतले.शिवणकाम,पार्लर, हॅन्डीक्राप्टस इ. अभ्यासक्रमांतून चार हजाराहून अधिक महिला स्वावलंबी.बनवण्याचाही मानस आहे.आतापर्यत सुमारे १५०० पेक्षा अधिक महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित करुन यशस्वी बनवले आहे.