अमरावती महानगरपालिका, अमरावती दैनंदिन स्‍वच्‍छतेसाठी महानगरपालिकेकडुन संपर्क क्रमांक जाहीर

प्रभागाच्‍या स्‍वच्‍छतेसाठी स्‍वास्‍थ निरीक्षकांशी संपर्क करावा

अमरावती प्रतिनिधी, जयकुमार बुटे

अमरावती महानगरपालिका आयुक्‍त डॉ.प्रवीण आष्‍टीकर यांनी सर्व सहाय्यक आयुक्‍तांना सुचित केले की, स्‍वच्‍छ सर्वेक्षणाच्‍या नियमावलीप्रमाणे सर्वांनी काम करावे. अमरावती शहरात कुठेही गटार साचलेले राहू नये याची दक्षता घ्‍यावी. नागरीकांनी तुबलेल्‍या गटाराचे जीओ टॅग फोटो संबंधीत कंत्राटदारांना पाठवावे. एखादी तक्रार दुरुस्‍त होत नसल्‍यास त्‍वरीत वरीष्‍ठांना सुचित करावे तसेच ज्‍या सुचना दिल्‍या जाईल त्‍याचे तंतोतंत पालन करा.

शहरातील प्‍लास्‍टीक उचलून घ्‍यावे, सार्वजनिक ठिकाणे स्‍वच्‍छ करुन ठेवावी व फॉगींग करण्‍यात यावी. सर्व साहित्‍य सफाई कामगारांना पुरवावे. त्‍यांनी यावेळी सर्व सहाय्यक आयुक्‍तांना स्‍पष्‍ट सुचना दिल्‍या की, प्रत्‍येकाने चांगली कामगिरी करणे गरजेचे असून सर्वांनी नियमाप्रमाणे काम करावे. शहर पुर्णपणे स्‍वच्‍छ करण्‍यासाठी प्रत्‍येकाने काम करणे गरजेचे आहे. उपायुक्‍त आणि वैद्यकीय अधिकारी (स्‍वच्‍छता) यांनी रोज शहरात फिरुन स्‍वच्‍छतेसंदर्भात जीओटॅग फोटो टाकण्‍याचे निर्देश आयुक्‍तांनी दिले आहे. सर्व सहाय्यक आयुक्‍तांनी आपल्‍या झोन क्षेत्रात फिरुन झालेल्‍या कार्यवाहीचे तसेच तक्रारीचे जीओ टॅग फोटो टाकण्‍याचे निर्देशही दिले आहे.

आयुक्‍तांनी यावेळी सांगितले की, प्रभागातून तक्रारी आल्‍यास संबंधीत कंत्राटदारांना दंड करण्‍यात यावा. प्रत्‍येकाने प्रामाणिक पणे काम करणे अपेक्षित आहे. महानगरपालिका व कंत्राटदार यामध्‍ये जे करारनामा झाला आहे त्‍याप्रमाणे कार्यवाही झाली पाहिजे. आयुक्‍तांनी सहाय्यक आयुक्‍तांना मनपाचे महत्‍वाचे घटक असल्‍याने तुमची जबाबदारी मोठी आहे. प्रत्‍येक प्रभागात रुटमॅप लावण्‍यात यावा तसेच स्‍वच्‍छ सर्वेक्षणाबाबत आवश्‍यक कार्यवाही करावी. कचरा इतरत्र टाकणा-यावर दंडात्‍मक कार्यवाही होणे अपेक्षित आहे. शहरातील मुख्‍य रस्‍त्‍यावरील कचरा उचलणे गरजेचे असून यापुढे कचरा मुख्‍य रस्‍त्‍यावर दिसल्‍यास संबंधीतांना तात्‍काळ विचारणा करुन आवश्‍यक ती कार्यवाही करण्‍यात यावी. शहरातील बांधकाम साहित्‍य अस्‍ताव्‍यस्‍त असल्‍यास त्‍याला दंड करण्‍यात यावा. शहरात मोठ्या प्रमाणात कचरा निघत आहे त्‍याचे संपुर्ण नियोजन करुन शहरात कुठेही कचरा दिसणार नाही याची दक्षता घ्‍यावी. सार्वजनिक संडास साफ करण्‍यात यावे. नागरिकांमध्‍ये स्‍वच्‍छतेबाबत जनजागृती करावी.

नागरिकांनी स्‍वच्‍छतेबाबत तक्रार करण्‍याकरीता उत्‍तर झोन क्र.१ रामपुरी कॅंम्‍प सहाय्यक आयुक्‍त योगेश पिठे मो.क्र.७०३०९२२८७९, जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक शाहेद अनवर शेख मो.क्र.७०३०९४०२५४, स्‍वास्‍थ निरीक्षक श्रीकांत डवरे मो.क्र.७०३०९२२९२५, परिक्षीत गोरले मो.क्र.७५५८४१७४६२, रोहीत हडाले मो.क्र.७०३०९४०२४२, श्रीमती शारदा गुल्‍हाणे मो.क्र.८६९८५२९५७५, सागर राजुरकर मो.क्र.७०३०९४०२२४, एन.के.गोहर मो.क्र.७०३०९२२९५३, श्री.हानेगावकर मो.क्र.७०३०९४०२२५, दिनेश निंधाने मो.क्र.७०३०९२२९५४, विलास डेंडुले मो.क्र.७०३०९२२९५० यांच्‍याशी संपर्क साधावे.

नागरिकांनी स्‍वच्‍छतेबाबत तक्रार करण्‍याकरीता मध्‍य झोन क्र.२ राजापेठ सहाय्यक आयुक्‍त नरेंद्र वानखडे मो.क्र.९०३०९२२९२२, जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक विजय बुरे मो.क्र.७०३०९२२९४०, स्‍वास्‍थ निरीक्षक प्रशांत गावनेर मो.क्र.७०३०९२२९२८, योगेश खंडारे मो.क्र.७०३०९२२९०७, मनिष हडाले मो.क्र.७०३०९२२९२१, महेश पळसकर मो.क्र.७०३०९४०२२३, डी.एन.कलोसे मो.क्र.७०३०९२२९३४, वैभव खरड मो.क्र.९९६०५९७६६४, अनिकेत फुके मो.क्र.७०३०९४०२५३ यांच्‍याशी संपर्क साधावे.

नागरिकांनी स्‍वच्‍छतेबाबत तक्रार करण्‍याकरीता पुर्व झोन क्र.३ दस्‍तुरनगर सहाय्यक आयुक्‍त नंदकिशोर तिखिले मो.क्र.७०३०९२२८८९, जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक कुंदन हडाले मो.क्र.७०३०९२२९५९, स्‍वास्‍थ निरीक्षक एस.डी.चोरपगार मो.क्र.७०३०९२२९४२, सागर इंगोले मो.क्र.९५५५८५८९३०, आशिष सहारे मो.क्र.७०३०९४०२३१, सुमेध मेश्राम मो.क्र.७०३०९४०२४७, पंकज तट्टे मो.क्र.७०३०९४०२५५, शक्‍ती पिवाल मो.क्र.८४४६६४४९३१, शैलेश डोंगरे मो.क्र.७०३०९४०२३०, अनुपकांत पाटणे मो.क्र.७०३०९४०२३२ यांच्‍याशी संपर्क साधावे.

नागरिकांनी स्‍वच्‍छतेबाबत तक्रार करण्‍याकरीता दक्षिण झोन क्र.४ बडनेरा सहाय्यक आयुक्‍त श्रीरंग तायडे मो.क्र.९३७०१५४२४१, जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक राजु डिक्‍यांव मो.क्र.७०३०९२२९३२, स्‍वास्‍थ निरीक्षक श्री.माहुलकर मो.क्र.७०३०९२२९५२, विनोद टांक मो.क्र.७०३०९२२९५१, इमरान खान मो.क्र.७०३०९२२९३८, मिथुन उसरे मो.क्र.७०३०९४०२३७, एकनाथ कुलकर्णी मो.क्र.७०३०९२२९३३, सतिश राठोड मो.क्र.७०३०९४०२२७ यांच्‍याशी संपर्क साधावे.

नागरिकांनी स्‍वच्‍छतेबाबत तक्रार करण्‍याकरीता पश्चिम झोन क्र.५ भाजीबाजार सहाय्यक आयुक्‍त तौसिफ काझी मो.क्र.९८९०२३५९६४, जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक विक्‍की जैधे मो.क्र.७०३०९२२९७१, स्‍वास्‍थ निरीक्षक आवेश शेख मो.क्र.७०३०९४०२५१, सैय्यद अ. हक्‍क मो.क्र.७०३०९४०२३४, पापा डिक्‍के मो.क्र.७७९६१८७०८९, प्रसाद कुलकर्णी मो.क्र.७०३०९२२९६६, श्री.नकवाल मो.क्र.७०३०९४०२२८, मोहीत जाधव मो.क्र.७०३०९४०२३५, जिवन राठोड मो.क्र.७०३०९४०२३३, छोटू पच्‍छेल मो.क्र.७०३०९२२९५० यांच्‍याशी संपर्क साधावे असे आवाहन महानगरपालिकेकडुन करण्‍यात आले आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील संपुर्ण जबाबदारी वैद्यकीय अधिकारी (स्‍वच्‍छता) डॉ.सिमा नैताम यांच्‍याकडे आहे. नागरिकांनी वैद्यकीय अधिकारी (स्‍वच्‍छता) डॉ.सिमा नैताम मो.क्र.७०३०९२२८७४ यांच्‍याशी स्‍वच्‍छतेच्‍या तक्रारीसाठी संपर्क करु शकता.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!