प्रतिनिधी सुनील बटवाल
चिंबळी दि २५( वार्ताहर) मोई ता खेड येथील ग्रामपंचायतीच्या उपसंरपच पदी अर्चना हरिष फलके यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे ग्रामसेवक भास्कर विर यांनी सांगितले.

मोई ता खेड येथील ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्याना काम करण्याची संधी मिळावी या हेतूने उपसंरपच शितल गवारे यांनी स्वखुशीने उपसंरपच पदाचा राजीनामा दिला असल्याने या रिक्त जागेसाठी सरपंच शिलाताई रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या उपसंरपच पदासाठी अर्चना फलके यांचा सर्वानुमते एकच अर्ज दाखल करण्यात आला असल्याने मोई ग्रामपंचायतीच्या उपसंरपच पदी अर्चना फलके यांची बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच शिलाताई रोकडे व ग्रामविकास अधिकारी भास्कर विर यांनी घोषित केले .

मावळत्या उपसंरपच शितल गवारे माजी उपसरपंच सचिन येळवडे सदस्य गोरक्ष गवारे विश्वनाथ गवारे कैलास साकोरे मंगल गवारे ज्योती करपे यांच्या हस्ते निवनिर्वाचित उपसंरपच अर्चना फलके यांचा ग्रामपंचायतीच्या व ग्रामस्थांच्या वतीने सरपंच व सर्व सदस्यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सर्व आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते याप्रसंगी म्हाळुंगे पोलीस चौकीच्या वतिने बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी पोलीस हवालदार विश्वास पाटील राहुल मिसाळ व पोलीस पाटील नारायण बिडकर उपस्थित होते .

मोई (ता खेड )येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भास्कर विर यांना जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श पुरस्कार मिळाला बद्दल मोई ग्रामपंचायतीच्या व ग्रामस्थांच्या वतीने सरपंच शिलाताई रोकडे पोलीस पाटील नारायण बिडकर माजी उपसरपंच किरण गवारे नवनिर्वाचित उपसंरपच अर्चना फलके व सदस्यांच्या वतिने ग्रामसेवक भास्कर विर यांचा सत्कार फेटा बांधून शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव करण्यात आला .
