Post Views: 453
विशेष प्रतिनिधी बापूसाहेब सोनवणे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झित्राईमळा येथे कार्यरत असणाऱ्या आदर्श शिक्षिका सौ. स्नेहल संजीव भोर यांच्या एटीएम(ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र) प्रकाशन निर्मित ‘ती’ चा मुक्त कॅनव्हास या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा विटस् सागर प्लाझा (विठ्ठल कामत) हॉटेल राजगुरू नगर येथे दिमाखात पार पडला.
या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रेरणादायी शिक्षणाधिकारी श्री. संजय नाईकडे साहेब उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस , त्यांच्या सुविद्य पत्नी ललिता सबनीस, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. दिगांबर दुर्गाडे, त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. स्वाती दुर्गाडे, आयुष मंत्रालय, भारत सरकार येथे कार्यरत असलेल्या योग प्रशिक्षक रचना सदाफुले-फासाटे , अंनिस राज्यकारणी महिला प्रमुख नंदिनीताई जाधव, कृतीशील शिक्षक महाराष्ट्र(एटीएम)चे राज्यसंयोजक श्री. विक्रम अडसूळ सर, श्री. नारायण मंगलारम उपस्थित होते.
सदर पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने कवयित्री सौ स्नेहल भोर यांचे सासु सासरे, आई वडील, मुले,शाळेतील विद्यार्थी, पालक मित्रपरिवार, आप्तेष्ट आवर्जून उपस्थित होते.
प्रकाशन सोहळ्याची सुरुवात गायिका पुनम पानसरे यांनी आपल्या मंजूळ आवाजात स्वागत गीताने केली. आलेल्या सन्मानीयांचा सत्कार भोर कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आला. त्यात कवयित्री यांनी आपले सासू सासरे आणि आई वडील यांचा केलेला सन्मान सभेसमोर आदर्शवत होता.
सदर प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक कवयित्री सौ. स्नेहल संजीव भोर यांनी केली. त्यांनी आपल्या कविता कशा सुचल्या आणि त्या कागदावर उतरवण्यासाठी त्यांना कोणी प्रेरित केले याचा उलगडा केला.
त्यानंतर प्रमुख पाहुणे आणि काव्यसंग्रहाला प्रस्तावना देणारे डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आपल्या ओघवत्या शैलीने आणि अभ्यासपूर्ण विवेचनाने काव्यसंग्रहाचे सुंदर रसग्रहण केले. कविता म्हणजे ह्रदयाची स्पंदने आणि उत्स्फूर्त भावभावनांचा ओघ असतात. तेच भाव कवयित्रीने आपल्या कवितेतून वाचकांसमोर सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मैत्री, नात्यांचे अनुबंध, निसर्गसख्य हे सर्व भाव कवयित्रीने आपल्या काव्यातून सहजपणे उलगडले असल्याचे डॉ. सबनीस यांनी स्पष्ट केले. सासूला कवितेतून थोर म्हणणारी कवयित्री आज आपल्या वास्तविक जीवनात सुद्धा आपल्या सासूला आपल्या आईप्रमाणे जपते याचा प्रत्यय त्यांनी कार्यक्रमादरम्यान केलेल्या सासू सासऱ्याच्या सन्मान सोहळ्यातून जाणवले हे डॉ. सबनीस यांनी आवर्जून सांगितले.
त्यांनतर रचना सदाफुले, सचिन गावडे, नंदिनीताई जाधव, विक्रम अडसूळ, नारायण मंगलराम, ईश्वर वाघमारे सर, प्रमिला आरोटे-डुंबरे यांनीही काव्यसंग्रहास शुभेच्छा दिल्या. कवयित्री स्नेहल भोर यांच्या कवितांचा प्रवास कसा झाला यावर मान्यवरांनी प्रकाश टाकला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्राध्यापक डॉ. दिगांबर दुर्गाडे यांनी शिक्षण क्षेत्रात घडत असलेल्या बदलांना शिक्षकाने कशाप्रकारे सामोरे गेले पाहिजे यावर भाष्य करताना सौ. स्नेहल भोर यांच्या कवितांचा गाभा दर्जेदार असल्याचे सांगितले. तद्नंतर अध्यक्षीय भाषणात शिक्षणाधिकारी श्री संजय नाईकडे साहेब यांनी कवयित्री स्नेहल भोर यांच्या कवितांची, त्यांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्वाची ओळख सभेला करून दिली.
सोहळ्याचे आभारप्रदर्शन श्री. संजीव भोर सर यांनी केले.
सुत्रसंचालन सत्यवान सहाणे यांनी केले. रंगोळीकार सचिन आढाळगे यांची अप्रतिम रांगोळी कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली.
कार्यक्रमास श्रेयशी प्रकाशन चे सतिश भोंग, संजय प्रिंटिंग प्रेसचे सोमनाथ पिंजण, मसाप खेडचे अध्यक्ष श्री. संतोष गाढवे, लेखक-कवी मनोहर मोहरे, बाबाजी शिंदे, जुनी पेंशन संघटनेचे अध्यक्ष श्री.सचिन गावडे आणि त्यांची कार्यकारिणी, खेड पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री. नारायण करपे, मा. विस्ताराधिकारी सौ.सुगंधा भगत, ज्ञानवर्धिनी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रमिला गोरे, भैरवनाथ विद्यालय वाकीचे मुख्याध्यापक श्री. व्यवहारे सर, भालेकर सर आणि स्टाफ, रेणुका माध्यमिक विद्यालय, रासेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा वाळुंज व त्यांचा स्टाफ, झित्राईमळा शाळेचे मुख्याध्यापक श्री.बनकर सर , पठाण सर व त्यांचा स्टाफ, मंचर एपटेकचे संचालक जयेश शिंदे, अंनिस चे राज्य सांस्कृतिक विभाग प्रमुख मनोहर (बापू) शेवकरी, कलाविष्कार मंच चाकण चे खजिनदार चंद्रकांत बुट्टे, उपाध्यक्ष विशाल बारवकर, चाकण प्रगती क्लास चे थोरवे सर, थोरवे मॅम, जलयोगप्रशिक्षक सोनवणे सर, साधना विद्यालय हडपसरचे परीक्षा विभाग प्रमुख घुंबरे सर, मावळ तालुका शिक्षक संघाचे मा.सरचिटणीस उमेश माळी, खेड तालुका शिक्षक समिती चे मा.तालुकाध्यक्ष श्री.सुर्यकांत शिंदे हे उपस्थित होते. सर्व साहित्य, राजकीय, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी स्नेहल भोर यांच्या साहित्य क्षेत्रातील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.