जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था पुणे आणि पुणे जिल्हा परिषद पुणे पंचायत समिती खेड यांच्या सयुक्त विद्यमानाणे तालुकास्तरीय शाळा पूर्व तयारी प्रशिक्षणाला दि.21/03/2022 रोजी SNG MBA कॉलेज माळेगाव त खेड येथे आनंददायी आणि उत्साहपूर्ण सुरुवात झाली.
सदर प्रशिक्षणाचे उदघाटन खेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा.जीवन कोकणे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळीज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मा बाळकृष्ण कळमकर साहेब यांनी झोकून देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे शिक्षकांना आवाहन केले.
प्रथम संस्थेचे मच्छीन्द्र पडवळ
सदर प्रशिक्षण तालुकास्तरावर 2 दिवस होणार आहे त्यानंतर केंद्रस्तरावर सर्व 1ते 5 चे शिक्षक,तसेच अंगणवाडी ताई आणि पर्यवेक्षिका यांना देण्यात येणार या आहे. त्यानंतर मार्च च्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पहिला शाळा पूर्व तयारी अभियान मेळावा होणार आहे त्यानंतर इयत्ता जून 2022 मधील पाहिलीसाठी प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना माता पालक गटामार्फत/शिक्षकांमार्फत 12 आठवड्यांचा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
विषयतज्ज्ञ दयानंद शिंदे
त्यानंतर जून च्या दुसऱ्या आठवड्यात दुसरा मेळावा होणार आहे.कोव्हिड काळात विद्यार्थ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन प्रवाहाच्या बाहेर फेकले गेले आहेत. त्यांना पुन्हा एकदा शैक्षणिक प्रवाहात सक्रिय करायचे आहे त्यासाठी नव्याने दाखल होणारा विद्यार्थी आणि दाखल असलेला विद्यार्थी आवडीने शिक्षण प्रक्रियेत कसा सहभागी करून घेता येईल त्याचप्रमाणे तो आवडीने आणि आनंदाने कसे शिक्षण घेईल त्यासाठी कोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहे यासंबंधी मार्गदर्शन या प्रशिक्षणाच्या माध्यमातून होणार आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबाजी शिंदे,सूत्रसंचालन दयानंद शिंदे, आभार प्रदर्शन कल्पना बोऱ्हाडे,मचिंद्र पडवळ प्रथम पुणे विभाग प्रमुख आणि टीम उपस्थित होते.तंत्रसहाय्य हरिष हजारे यांनी केले.