Post Views: 362
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न,
‘हुंडा देणे व घेणे गैर कायदेशीर’ दिवाणी न्यायधीश श्री. मिलिंदकुमार बुराडे यांचे प्रतिपादन
दर्यापूर – महेश बुंदे
२ ऑक्टोंबर २०२०१ ते १४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत साजरा होत असलेल्या आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत भारतभर जागृतता व पोहोच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून दिनांक २७ ऑक्टोंबर २०२१ रोजी सकाळी ९ वाजता ग्राम वडनेरगंगाई या ठिकाणी कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रतिमांचे पूजन व पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक एडवोकेट श्री. वैभव इंगळे यांनी करून उपस्थितांना कार्यक्रमाचे स्वरूप सांगितले. दिवानी न्यायाधीश श्री. मिलिंदकुमार बुराडे यांनी उपस्थितांना ‘हुंडा देणे व घेणे गैरकायदेशीर आहे’ यावर बहुमुल्य मार्गदर्शन केले. यावेळी एडवोकेट श्री. एन. जी थर्डक अध्यक्ष वकील संघ दर्यापूर, एडवोकेट श्री. विद्यासागर वानखडे यांचे सुद्धा मोलाचे मिळाले. कार्यक्रमाचे संचालन मालाताई डोईफोडे यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामपंचायत वडनेर गंगाईचे उपसरपंच सौ. मोहिनीताई हुतके यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
सदरील कार्यक्रमासाठी एडवोकेट श्री. एन. जी थर्डक अध्यक्ष वकील संघ दर्यापूर, एडवोकेट श्री. विद्यासागर वानखडे, एडवोकेट श्री. वैभव इंगळे, पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी श्री सुधीर अरबट, श्री शिंदे पोलीस उपनिरीक्षक येवदा, सौ. गौकर्नाताई इंगळे सरपंच ग्रामपंचायत वडनेर गंगाई, सौ. मोहिनीताई हुतके, उपसरपंच ग्रामपंचायत वडनेर गंगाई, न्यायालयीन कर्मचारी श्री. वैभव ताथोड, कनिष्ठ लिपिक श्री. विनोद गवई, श्री हरिभाऊ पालखेडे, श्री. अश्विन बुडेकार सह पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, माजी सैनिक, पोलिस कर्मचारी, गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.