दर्यापूर – महेश बुंदे
महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येत असलेली राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना सामाजिक कार्यांकडे आकर्षित करते. पुस्तकी शिक्षणाला कृतीशीलतेची जोड दिल्याशिवाय अशा शिक्षणाचा व्यवहारांमध्ये उपयोग होणार नाही. राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना कृतीशील शिक्षण देणारी कार्यशाळा आहे त्याचा युवकांनी व्यक्तीमत्व विकासासाठी उपयोग करुन घ्यावा असे प्रतिपादन माजी कार्यक्रम अधिकारी डॉ. नरेंद्र माने
यांनी केले.
