स्पायडर (कातीन) संशोधक सौ. भावना भुतडा यांची सारथीच्या फेलोशिपकरिता निवड

बातमी संकलन – महेश बुंदे

अमरावती वार्ता – अमरावाती येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती येथील प्राणिशास्त्र विभागात संशोधन स्पायडर (कातीन) या किड्यावर संशोधनकर्त्या सौ. भावना संकेत भुतडा (भावना ओंकारराव गावंडे) ह्यांची नुकतीच अत्यंत प्रतिस्ठेची समजली जाणारी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेची छत्रपती शाहू महाराज आधीछात्रवृत्ती (फेलोशिप) – २०२१ करिता निवड झाली आहे. ह्या फेलोशिप करिता महाराष्ट्रातील विविध संशोधन संस्थेमध्ये संशोधन करणार्‍या बर्‍याच विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता, त्यापैकी ५५१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सौ. भुतडा यांनी ही फेलोशिप त्यांच्या पिएचडी संशोधन कार्यकारिता दिली जाणार आहे.

संशोधनकर्त्या सौ. भावना संकेत भुतडा यांचे स्पायडर (कातीन) या विषयावर एमफील झाले असून आपल्या संशोधनातून त्यांनी जागतिक स्तरावर अनेक संशोधन पेपर सुद्धा प्रकाशित केले आहेत. अत्यंत उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांनी जागतिक स्तरावर ड्रासोडेस समर्री ही नवीन स्पेजिस शोधली आहे. या स्पीडर स्पेसीज ची नोंद वर्ल्ड स्पीडर कटलोग मध्ये सुद्धा नोंद घेण्यात आली आहे. सौ. भावना संकेत भुतडा यांना या संशोधन कार्यकारिता अनेक प्रतिस्ठेचे माहेश्वरी प्रतिभा सम्मान २०१८ माजी मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस व मा. सुमित्रा महाजन यांचे हस्ते, महाराष्ट्र सरकार द्वारा प्रेरणा पुरस्कार २०१९, अमरावती गौरव पुरस्कार, भारत गौरव पुरस्कार, समाज गौरव पुरस्कार, भरारी पुरस्कार आदि प्राप्त झाले आहेत. सौ. भुतडा ह्या जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कार्यरत असल्यामुळे त्यांचा महाविद्यालयीन स्थानिक विकास समितीद्वारे नुकताच सत्कार करण्यात आला.

श्री शिवाजी शिक्षण संथेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र शेळके, कोशाध्यक्ष दिलीप इंगोले, केशवराव मेटकत, हेमंत काळमेघ, सचिव शेशराव खाडे महाविद्यायालयाचे प्राचार्य डॉ. दीनदयाल ठाकरे, महाविद्यालयीन स्थानिक विकास समिती सदस्य जयप्रकाश भुतडा, प्रा. काळे, डॉ. चांदूरकर, आयक्यूएसी समन्वयक प्रा. होले आदींनि भावी संशोधन कार्यास शुभेछा दिल्या. सौ. भावना संकेत भुतडा आपल्या यशाचे श्रेय संशोधन मार्गदर्शक डॉ. झाडे मॅडम, श्री संकेत भुतडा, व त्यांच्या परिवरातील सर्वच सदस्यांना देत आहेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!