प्रतिनिधी सुनील बटवाल
चिंबळी दि२० (वार्ताहर) कुरुळी:आनंद इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये अखंड भारत देशाचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख उपस्थिती अरविंद पवार (पी. आय माळुंगे पोलीस स्टेशन) तसेच आनंद मेडिकल फाउंडेशन व आनंद स्कूलचे अध्यक्ष डॉ. गजानन मंकिकर संस्थापक डॉ .अनिल काळे मुख्याध्यापिका सरला रेवगडे व गावातील इतर मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे व प्रतिमेचे पूजन करण्यात आले .छत्रपती शिवाजी महाराजांची सामुदायिक आरती करण्यात आली.
