दर्यापूर | विषबाधा झाल्याने ८४ बकऱ्या, मेढ्यांचा दुर्दैवी मुत्यूं

दर्यापुर – महेश बुंदे

दर्यापूर तालुक्यातील भूजवाडा गावातील पुरुषोत्तम टाले यांच्या शेत शिवारामध्ये चराईसाठी आलेल्या १० बकऱ्या व ७४ मेंढ्याचा विषबाधेमूळे दुर्दैवी मुत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरवारी उघडकीस आली आहे. पुसद तालुक्यातील जितेश राठोड हे २०० किलोमीटरचे अंतर पार करून आपल्या कुटुंबासह पोट भरण्यासाठी मेंढ्या चराईचा व्यवसायासाठी शेतामध्ये वन वन फिरतात. मेंढ्यांच्या भरोशावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो परंतु आता मोठ्या प्रमाणात बकऱ्या, मेंढ्याचा मुत्यू झाल्यामूळे जितेश राठोड यांचा संसार उघड्यावर आला आहे.

गुरवारी ऊशीरा सदर घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी दर्यापूर पोलिसांना व पशुसंवर्धन विभागाला दिली. दरम्यान रात्रीच सहाय्यक आयुक्त डॉ.व्हि.बी देशमुख, डॉ.मिलींद काळे व पोलीसांनी भुजवाडा येथे भेट देऊन माहीती जाणून घेतली. तसेच तडफडत असलेल्या २ शेळ्यांना वेळेत उपचार मिळाल्याने जिव वाचविण्यात यश आल्याची तालुका पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान शुक्रवारी सकाळी तलाठी रविकांत भटकर, डॉ. राजेश निचळ आदी अधीकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत रितसर पंचनामा केला. सर्व मुत्यू झालेल्या बकऱ्या, मेंढ्यांना जेसीबीच्या साह्याने खड्डा खोदून दफनविधी करण्यात आला. यामध्ये पशुमालक जितेश राठोड यांचे एकूण पंधरा लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी शिवसेना उपतालुका प्रमुख योगेश बुंदे सह पोलीस कर्मचारी डॉक्टर उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!