अध्यक्षपदी आरिफ पोपटे सचिवपदी गणेश बागडे यांची निवड
प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाची बैठक नुकतीच स्थानिक विश्रामगृह कारंजा येथे संपन्न झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार बंडूभाऊ इंगोले होते तर प्रमुख उपस्थिती एकनाथ पवार ,दादाराव बहुटे, प्रभाकर सोमकुवर ,यांची उपस्थिती होती यावेळी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघटना कायम पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय प्रस्थापित करणारे राज्यातील एकमेव संघटना आहे त्यामुळे कारंजा तालुक्यातील पत्रकारांना संघटित करून ही संघटना मजबुतीने सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम करेल.
