प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:- जिल्हा पोलीस दलामध्ये श्री.बच्चन सिंह(IPS) यांनी पोलीस अधिक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यापासून अनेक नवनविन उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. त्यानुषंगाने आज दि.१९.०२.२०२२ रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय वाशिम येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह(IPS) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात केली. यावेळी ऊपस्थितांना संबोधित करतांना पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह(IPS) यांनी शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप’ या उक्तीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण प्रत्यक्ष जीवनात व दैनंदिन पोलीस कामकाजात कशी उतरवता
येईल याबाबत मार्गदर्शन केले.
१) ‘आपल्या ध्येयाप्रती टाकलेले लहानात लहान पाऊलसुद्धा आपल्याला भविष्यात मोठ्यात मोठे ध्येय गाठण्याकरिता
सहायक ठरते.’
२) ‘शत्रू कितीही बलवान असला तरी त्याला आपण आपल्या ध्येय व उत्साहाने पराभूत करू शकतो.’
३) ‘जेव्हा आपला ध्येयाप्रती असलेला निश्चय दृढ असेल तेव्हा मार्गात येणारे संकटांचे डोंगर कितीही मोठे असले तरी ते संकट मातीच्या ढिगाऱ्याप्रमाणे भासेल.’अशा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणीप्रमाणे व कार्यशैलीने प्रेरित होऊन पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह(IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम जिल्हा पोलीस दल नागरिकांच्या सरंक्षण व सुरक्षिततेसाठी सतत प्रयत्नशील असून वाशिम जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल कटिबद्ध आहे.
