तिमाही ई-आर-१ विवरणपत्र ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

प्रतिनिधी फुलचंद भगत :-


वाशिम: जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांना दर तीन महिन्यांनी ऑनलाईन ई-आर-१ सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा) अधिनियम १९५९ व नियमावली १९६० मधील कलम ५ (१) व कलम ५ (२) नुसार सादर करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यासाठी सर्व आस्थापनांना यापूर्वी प्राप्त झालेला युझर आयडी व पासवर्ड टाकून १ जुलै २०२1 ते ३० सप्टेंबर २०२1 या तिमाही कालावधीचे (आस्थापनाच्या हजेरी पत्रकाच्या कर्मचारी संख्येनुसार) ई-आर-१ माहे ऑक्टोबर २०२1 अखेरपर्यंत ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.

ई-आर-१ भरण्यासाठी http://www.mahaswayam.gov.in या नवीन वेबपोर्टलचा वापर करून ‘एम्प्लॉयमेंट’ या टॅबमध्ये एम्प्लॉयर लॉगीनमधून आपल्या आस्थापनेची माहिती (प्रोफाईल) त्वरित अद्ययावत करावी व तिमाही विवरण ई.आर.-१ ऑनलाईन ३१ ऑक्टोबर २०२1 पूर्वी सादर करणे आवश्यक आहे, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी कळविले आहे. याबाबत काही अडचणी असल्यास कार्यालयाच्या ०७२५२-२३१४९४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!