देविभक्त शेखर महाराजांनी घेतली मध्य प्रदेशाच्या सांस्कृतिक मंत्र्यांची भेट ; समाज बांधवांचे विकासात्मक प्रश्न सोडविण्यासाठी दिले निवेदन

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम:-मानोरा तालुक्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील दिवंगत संत डॉ.रामराव महाराज यांचे नातू शेखर महाराज हे विज्ञानवादी आणि क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त मध्यप्रदेश दौऱ्यावर आहेत.मध्यप्रदेश राज्यामध्ये बंजारा समाज मोठ्या प्रमाणात असून हा समाज संत सेवालाल,रामराव महाराज,जगदंबा माता यांना मानणाऱ्या इतरही समाज व भक्तगणांची विविध सामाजिक, आर्थिक प्रश्न प्राधान्याने मार्गी लागावेत यासाठी शेखर महाराज यांनी मध्यप्रदेश सरकार मधील सांस्कृतिक मंत्री ना.ऊषा ठाकूर यांची आपल्या अनुयायी समवेत भेट घेऊन निवेदन देण्यात दिले.ज्या प्रमाणे बाल ब्रम्हच्यारी संत रामराव महाराज यांनी भारत देशातील बहुतांश प्रांतात जाऊन संत शिरोमणी सेवालाल महाराज यांचे विचार आणि तत्व समाजाच्या प्रत्येक घटका पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्याच प्रमाणे देविभक्त महंत शेखर महाराज हे सुध्दा विविध प्रांतातील तांड्यात जाऊन संत रामराव महाराजाच्या स्वप्नाला पुढे नेण्याचे प्रयत्न करीत आहेत.

मुलांना वाईट व्यसना पासून दूर ठेवून त्यांना चांगले शिक्षण द्या.दारू, मटका,जुगार,गुटका या वाईट व्यसना पासुन् आपनही दूर रहा आनी आपल्या मुलाना देखिल दूर,ठेवा कष्ट करा परंतु आपल्या मुलांना शिक्षण शिकवा कारण शिक्षणा शिवाय परिवर्तन नाही आणि जीवनाचा विकास शिक्षणा शिवाय शक्य नाही असे मोलाचे मार्गदर्शन या वेळी त्यांनी केले.विद्यार्थ्यांनी आपला अमूल्य वेळ मोबाईल मध्ये व्यर्थ न घालविता तो वेळ आपण ज्ञान साधनेला दिला पाहिजे जेणे करून तो वेळ तुमच्या जीवनाच्या उज्वल भविष्या करिता उपयुक्त राहील असा मोलाचा सल्ला मध्यप्रदेशातील वेगवेगळ्या तांड्या मध्ये शेखर महाराज देत आहेत.या वेळी रुपेश जाधव ,गहुली संतोष चव्हाण आणि मानोरा तालुक्यातीलही भक्त महाराजांसोबत होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!